Car Cow Dung Saam Tv
देश विदेश

Car Cow Dung: आयडियाची कल्पना! उन्हाला इतका वैतागला की पठ्ठ्यानं चक्क गाडीच शेणाने सारवली...

Latest News: शेणाने सारवलेल्या या कारचालकाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Priya More

Madhya Pradesh News: देशातील अनेक राज्यामध्ये सध्या उष्णतेची लाट (Heat wave) पसरली आहे. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी उष्माघाताने (Heat Stroke) अनेकांचा बळी गेला आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय शोधून काढत आहेत. अशामध्ये उकाड्यामुळे हैराण झालेल्या एका व्यक्तीने चक्क आपली अल्टो कार शेणाने (Cow Dung) सारवून टाकली आहे. या कारचालकाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

उन्हाळ्यात गाडी चालवणे म्हणजे खूपच त्रासदायक असते. दुचाकीचालकांसह कारचालकही हैराण झाले आहेत. या कडक उन्हात गाडीच्या एसीचाही कधीकधी काहीच फायदा होत नाही. त्यामुळे कारचालक त्यांच्या गाडीमध्ये अनेक बदल करत असतात. पण कधी कधी हे बदल ऐवढे विचित्र होऊ जातात की त्याची देशभर चर्चा होते.

उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मध्य प्रदेशमधील एका व्यक्तीने जबरजस्त आयडिया शोधून काढली आहे. त्याने आपली कार शेणानेच सारवून टाकली आहे. असे केल्यामुळे एसी नसतानाही कारचे तापमान सामान्य राहते, असा दावा या व्यक्तीने केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या एका डॉक्टरने हा पर्याय शोधून काढला आहे. ते स्वत: होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. या डॉक्टरने आपल्या गाडीच्या छतापासून बोनेटपर्यंत संपूर्ण गाडीच शेणाने सारवून टाकली आहे. गाडीचा बाहेरील भाग थंड ठेवण्यासाठी त्यांनी हे असं केलं आहे. त्यांनी दावा केला आहे की, यामुळे कारच्या आतील तापमान जास्त गरम होत नाही. असे केल्याने गाडीच्या एसीची कार्यक्षमता देखील सुधारते.

गायीच्या शेणामध्ये उष्णता प्रतिरोधक क्षमता असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे बाहेरून येणारी उष्णता गाडीच्या आत कमी होऊन गाडी थंड राहते. डॉक्टरांचा दावा आहे की, 'कारचे छप्पर गरम होण्यासाठी सर्वात जास्त जबाबदार आहे. या मार्गाने गरम हवा कारच्या आतमध्ये प्रवेश करते आणि तापमान वाढते. अशा परिस्थितीत गायीचे शेण छतावरच टाकल्यास आतील तापमान सामान्य राहते.

अशापद्धतीने संपूर्ण गाडी शेणाने सारवून टाकण्याची ही पहिलीच घटना नाही. कार शेणाने सारवण्याची ही क्रेझ गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. 2019 मध्ये एका व्यक्तीने टोयाटो कार शेणाने सारवली होती. त्यानंतर उन्हापासून वाचण्यासाठी अहमदाबादच्या सेजल शहा यांनी देखील आपली कार शेणाने सारवली होती. पुण्यातील एका डॉक्टरने सुद्धा आपली कार शेणाने सारवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT