Dire Wolf Rebirth  saam tv
देश विदेश

Dire Wolf: डायर वुल्फचा पुनर्जन्म; लांडग्यांप्रमाणे डायनासोरही परतणार?

Dire Wolf Rebirth : जर तुम्ही गेम ऑफ थ्रॉन्स सीरिज पाहिली असेल तर तुम्हाला स्टार्क कुटुंबातील लांडग्यांबद्दल नक्कीच माहिती असेल. या पांढऱ्या लांडग्यांना डायर वुल्फ म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी नामशेष झालेले लांडगे परत आणण्यात आलेत. विज्ञानाने आपली जादू दाखवलीये.

Tanmay Tillu

नामशेष झालेल्या लांडग्यांच्या प्रजाती डायर वुल्फचा पुनर्जन्म करून अमेरिकन शास्त्रज्ञांनी इतिहास रचलाय. अमेरिकेतील डलास येथील बायोटेक कंपनी कोलोसल बायोसायन्सेसने हे यश मिळवलंय.अशा परिस्थितीत, डायनासोरसारखे नामशेष झालेले प्राणी देखील या तंत्रज्ञानाद्वारे परत येऊ शकतील का, हा प्रश्न आहे. डायनासोर सुमारे 66 दशलक्ष वर्षांपूर्वी नामशेष झाले होते. दरम्यान, कंपनीनं हे यश कसं मिळवलं आणि डायर वुल्फ नेमके कसे होते पाहूया

लांडगा आला रे आला !

72 हजार वर्ष जुन्या डीएनएमधून डायर लांडग्याचा पुनर्जन्म

DNA, क्लोनिंग आणि जीन एडिटिंग तंत्रांचा वापर

हे 100 टक्के डायर वुल्फ नाहीत

मूळ डायर वुल्फमध्ये 80 वेगवेगळे जीन्स होते

मूळ डायर वुल्फ मोठे भक्षक,आकारानं मोठे,शक्तिशाली लांडगे होते

मूळ प्रजाती उत्तर अमेरिकेच्या जंगलातील सर्वात धोकादायक प्रजाती

सध्या डायर प्रजातीच्या तीन लांडग्यांचा जन्म, दोन नर, एक मादी

मुळात या तंत्रज्ञानामुळे लाल लांडगा आणि टस्कनी सिंह यासारख्या धोक्यात असलेल्या प्रजाती वाचू शकतात. यामुळे परिसंस्थेचे संतुलन राखण्यास देखील मदत होऊ शकते. कंपनी आता 2028 पर्यंत वूली मॅमथ परत आणण्याची योजना आखतेय. यासह डोडो पक्षी आणि टांस्मॅनियन वाघांच्या पुर्ननिर्मितीचं काम सुरू केलं. त्यामुळे आगामी काळात जीवसृष्टीत बदल होऊन लुप्त झालेले डायनोसॉर पुन्हा पृथ्वीवर जन्म घेणार का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कुतूहल निर्माण करतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT