Madhya Pradesh Road Accident News  Saam TV
देश विदेश

Accident News: दिंडोरीत ब्रेक फेल झाल्याने पिकअपला भीषण अपघात; १४ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

Satish Daud

Madhya Pradesh Road Accident News

मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत. ही दुर्देवी घटना बुधवारी (ता. २८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृतांमध्ये ९ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

या घटनेवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला असून मृतांना शासकीय मदत जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त व्यक्ती एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमाही देवरी गावातून मसुरघुगरी पोलीस स्टेशन परिसरात गेले होते.

कार्यक्रमाहून परतत असताना बुधवारी रात्री दिंडोरी जिल्ह्यातील बडझर घाटात अचानक पिकअपचा ब्रेक फेल झाला. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले काही क्षणातच पिकअप २० फूट खोल दरीत जाऊन उलटला.

हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी आरडाओरड झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्याशिवाय स्थानिकांनीही तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सद्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गुलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

SCROLL FOR NEXT