Petrol & Disel Pump saam tv
देश विदेश

Diesel Price: २५ रुपयांनी डिझेल महागलं; दरवाढीचा काेणाला बसणार झटका, जाणून घ्या

पेट्रोलियम कंपन्यांकडे बुक केल्या जाणा-या टँकरची संख्या देखील कमी झाली आहे.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेल (petrol) आणि तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता घाऊक ग्राहकांना प्रति लिटर डिझेलसाठी २५ रुपये (diesel price hike by rs 25) जादा माेजावले लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची (international crude oil prices) किंमत ४० टक्क्यांनी वाढल्याने डिझेलच्या (diesel) दरात लिटरमागे २५ रुपयांनी वाढ झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. दरम्यान पेट्रोल पंपांवरून विकल्या जाणाऱ्या डिझेलच्या किरकोळ दरात (retail prices) कोणताही बदल झालेला नाही असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. (diesel price latest marathi news)

सहसा थेट पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन खरेदी करणा-या घाऊक ग्राहकांनी (मॉल्स) पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदी केले आहे. यामुळे या महिन्यात डिझेलच्या पेट्रोल पपांतील विक्रीत २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे किरकोळ विक्री करणाऱ्या कंपन्यांचा तोटा वाढला आहे.

मुंबईत घाऊक ग्राहकांसाठी १२२.०५ रुपये प्रति लिटर अशी डिझेलची किंमत असून हेच डिझेल पेट्रोल पंपांवर ९४.१४ रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. दिल्लीतील पंपावर डिझेलची किंमत ८६.६७ रुपये प्रति लिटर आहे तर घाऊक किंवा औद्योगिक ग्राहकांसाठी त्याची किंमत ११५ रुपये प्रति लिटर आहे.

दराच्या माेठ्या तफावतीमुळे घाऊक ग्राहक पेट्रोल पंपावरून इंधन खरेदी करु लागले आहेत. परिणामी पेट्रोलियम कंपन्यांकडे बुक केल्या जाणा-या टँकरची संख्या देखील कमी झाली आहे. त्याचा ताेटा पेट्रोलियम कंपन्यांना हाेत आहे असेही सूत्रांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT