Narendra Modi, Vladimir Putin Saam TV marathi
देश विदेश

PM Modi : पुतिन न्यूक्लियर अटॅक करणार होते, पण मोदींनी थांबवलं; जगाच्या राजकारणात खळबळ उडवणारा दावा

Russia Ukraine War : पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दावा केला आहे की, २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधून अण्वस्त्रांचा वापर टाळण्यास प्रभाव टाकला.

Namdeo Kumbhar

Polish minister claims Modi stopped Putin nuclear attack : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाला अणुहल्ला करण्यापासून रोखलं होतं, असा दावा पोलंडच्या एका बड्या मंत्र्याने केला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धाची धग अजुनही सुरू आहे. त्यातच आता पोलंडच्या मंत्र्याने केलेल्या दाव्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

२०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध अत्यंत टोकाला गेले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनवर अणुहल्ला (Nuclear Attack) करण्याच्या तयारीत होते. पण मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करत पुतिन यांना थांबवले, असा दावा पोलंडच्या एका बड्या मंत्र्याने केला आहे. या दाव्यामुळे जागतिक राजकारणात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्देगिरीची चर्चा सुरू झाली आहे.

पोलंडच्या मंत्र्याच्या मते, २०२२ मध्ये रशिया युक्रेनविरुद्ध न्यूक्लियर हल्ल्याचा वापर करणार होते. त्या गंभीर परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक पातळीवर हस्तक्षेप केला. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी थेट संवाद साधून, अण्वस्त्रांचा वापर न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मोठा विनाश टळला. दरम्यान, यापूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर संस्था आणि इतर पाश्चात्य देशांनीही अशाच प्रकारचा प्रत्यय आला होता. त्यावेळी समरकंद येथे झालेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्यासमोर जाहीरपणे "हे युद्धाचे युग नाही" असे ठामपणे सांगितले होते. मोदींच्या या भूमिकेचे संपूर्ण जगाने स्वागत केले होते.

पोलंडचे मंत्री नेमकं काय म्हणाले ?

पोलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव व्लादिस्लाव तेओफिल बार्टोसेव्स्की यांनी नवी दिल्लीत रशिया-युक्रेन युद्धावर केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात अतिशय प्रसिद्ध नेते आहेत. एक अलिप्त राष्ट्र म्हणून भारताचे रशियन फेडरेशनशी आणि त्याआधी सोव्हिएत युनियनशी खूप जुने संबंध राहिले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे पंतप्रधान मोदी यांच्या बोलण्याकडे खरोखरच गांभीर्याने लक्ष देतात.

२०२२ च्या शेवटी युक्रेनमध्ये जेव्हा युद्ध टोकाला गेले होते, तेव्हा पुतिन यांना 'टॅक्टिकल न्यूक्लियर वेपन्स' (मर्यादित क्षमतेची अण्वस्त्रे) वापरण्यापासून रोखण्यात पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती, याचा उल्लेख मी आधीच केला आहे. जगात मोजकेच लोक असे आहेत जे पुतिन यांच्यावर प्रभाव टाकू शकतात किंवा त्यांच्यावर दबाव आणू शकतात, त्यापैकी पंतप्रधान मोदी हे एक आहेत. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारत नक्कीच आपल्या ताकदीचा वापर करू शकतो, असेही ते म्हणाले.

रशियन तेलावरून असलेले मतभेद मिटवले -

भारताने रशियाकडून स्वस्त कच्च्या तेलाची खरेदी केल्यामुळे पोलंड आणि भारत यांच्यातील कटुता आता कमी झाली आहे. बुटोव्स्की यांनी मान्य केले की, पोलंडचा सुरुवातीला या खरेदीला विरोध होता, कारण रशिया तेलाच्या पैशांचा वापर युद्धासाठी करत होता. त्यामुळे आधी आम्ही भारताच्या रशियन तेल खरेदीवर टीका करायचो. पण त्यामागील आर्थिक कारणही आम्हाला समजते, कारण भारताला हे तेल बाजारभावापेक्षा सुमारे ४० टक्के मोठ्या सवलतीत मिळत होते. आता दोन्ही देशांना एकमेकांचा दृष्टिकोन अधिक चांगल्या प्रकारे समजला आहे आणि हा मुद्दा आता आमच्यामध्ये मोठा राहिलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Crime: रायगड हादरलं! झोपलेल्या ५ वर्षाच्या मुली पळवलं,नंतर चिमुरडीचा घेतला जीव

Wednesday Horoscope : डोकं शांत ठेवा, ५ राशींची होणार चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

KDMC Hospital: डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरण; शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंना जामीन मंजूर

Maharashtra News Live Update: पुणे शहरातील पाणी कपात तूर्तास टळली

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर थरारक घटना; मुंबईला जाताना धावत्या कारमध्ये पत्नीची हत्या, त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये पोहचला अन्...

SCROLL FOR NEXT