Dhruv Rathee Viral Video News  AI Image
देश विदेश

Dhruv Rathee : "पोलिसांनी माझं अपहरण केलं..." 'त्या' दिवशी काय घडलं? ध्रुव राठीने सर्व सांगितलं; पाहा VIDEO

Dhruv Rathee Video News : दिल्लीतील जंतरमंतर आंदोलनादरम्यान ताब्यात घेतल्यानंतर ध्रुव राठीची २२ ते २३ तासांनी सुटका झाली. सुटकेनंतर व्हिडिओ पोस्ट करत त्याने अपहरणाचा दावा केला. अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचीही सुटका झाली.

Alisha Khedekar

  • दिल्लीतील जंतरमंतरवर ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन

  • आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राठीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते

  • सुटकेनंतर ध्रुव राठीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून आपले अपहरण केल्याचे म्हटलं

राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाच्यापूर्वी सर्वात आधी ध्रुव राठीला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर काल अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विमानातून पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दरम्यान २२ ते २३ तासानंतर ध्रुव राठीची सुटका करण्यात आली, तसेच आज सकाळी अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सुटका करण्यात आली. यानंतर आज ध्रुव राठीने सोशल मीडियावर पोस्ट करत, पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली असून मला अटक नाही तर माझे अपहरण करण्यात आल्याचे म्हटले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी गुरुग्राममधील सेक्टर 56 येथील ध्रुव राठी यांच्या घरातून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, घरी परत आल्यानंतर राठीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्याने, आपल्याला अटक किंवा ताब्यात घेतले नसून आपले अपहरण करण्यात आल्याचा दावा केला. सकाळी काही माणसं माझ्या घराबाहेर फिरत होती. माझ्या आईने दरवाजा उघडताच त्यांना ढकलून ती माझ्या घरी घुसल्याचे राठीने व्हिडिओत म्हटले.

दरम्यान, आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी CJP शी संबंधित अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रंका यांनाही प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. शनिवारी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तीन हजारांहून अधिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्री उशिरा सोडल्याचे वृत्त आहे.

आंदोलनादरम्यान दिल्ली मेट्रो सेवा आणि काही स्थानकांवरील निर्बंधांचाही मुद्दा चर्चेत आला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यापूर्वी न्यायालयाने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करू नये, असे निर्देश दिल्याचे वृत्त आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था, आंदोलनाचा अधिकार आणि पोलिसांच्या कारवाईबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan-Latur Highway: मुंबईवरून लातूरला पोहचा फक्त ५ तासांत, तयार होतोय नवा एक्स्प्रेस वे; कोणकोणत्या जिल्ह्यातून जाणार?

Chanakya Niti : ऑफिसमध्ये प्रत्येकाच्या आवडीचे असतात असे लोक; त्यांच्यात असतात हे ७ खास गुण

Maharashtra News Live Update: ओबीसी हक्कांच्या लढ्याला नवी दिशा देण्यासाठी नागपुरात राष्ट्रीय रणनीती बैठकीला सुरुवात

PF मधून पैसे काढणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! TDS सवलतीसाठी आता भरावा लागणार नवीन फॉर्म

उकडलेली अंडी किती वेळ टिकतात? विषबाधा होऊ नये म्हणून स्टोरेज कसं करावं, वाचा टिप्स

SCROLL FOR NEXT