Dhruv Rathee and Prakash Raj Join the Campaign saam tv
देश विदेश

ज्ञानेश कुमारांविरोधात ध्रुव राठी मैदानात, मुंबईनंतर बंगळुरूत सीजेपीचं आंदोलन

Dhruv Rathee Demands Gyanesh Kumar’s Resignation: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात संपूर्ण देशात आंदोलनाचा धुरळा उडालाय. निवडणूक आयोगाच्या कारभारा विरोधात आता एका प्रसिद्ध यूट्युबरची एन्ट्री झाली आहे. सत्ताधाऱ्यांना जेरीस आणणारा कोण आहे हा तरुण ? बंगळुरमध्ये सीजेपीच्या आंदोलनात काय घडलं ? पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात संपूर्ण देशात आंदोलनाचं रान पेटलंय. एकीकडे इंडीया आघाडी दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन करत असताना कॉक्रोज जनता पार्टीनेही ज्ञानेशकुमार हटावची मागणी लावून धरलीये. विशेष म्हणजे सीजेपीच्या आंदोलनात प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीची एन्ट्री झालीय...

बंगळुरुमध्ये झालेल्या आंदोलनात ध्रुव राठीनं ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी केली. फ्रीडम पार्कमधील आंदोलनात ध्रुव राठीसह अभिनेते प्रकाश राज, सीजेपीचे अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका उपस्थित होते. नेहमीच आपल्या व्हिडीओतून भाजप सरकारला चिमटा काढणाऱ्या ध्रुवने बंगळुरमध्येही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.

दुसरीकडे अभिनेते प्रकाश राज यांनीही सिंघम मधील प्रसिद्ध डायलॉंग म्हणून ज्ञानेशकुमारांना इशारा दिलाय. सीजेपीने 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन केलं होतं. त्यावेळी जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, नसीररूद्दीन शाह, संगीतकार विशाल ददलानी सहभागी झाले होते. या आंदोलनात 'गो ज्ञानू गो..' अशी हाक देण्यात आली होती. आता सीजेपीचं आंदोलन दक्षिणेतल्या राज्यात होतंय. कोट्वधी फॉलोअर्स असलेला आणि परदेशातून आपल्या प्रभावी व्हिडीओने सत्ताधाऱ्यांना जेरीस आणणारा ध्रुव राठीने पाठींबा दिल्याने सीजेपीचे ताकद वाढली आहे.

मुंबईृ-बंगळुरूनंतर आता सीजेपीचा १० ऑक्टोबरला थेट राजधानी दिल्लीतल्या जंतरमंतरवर दुसऱ्यांदा मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याआधीच ज्ञानेश कुमार राजीनामा देणार की पुन्हा टोकाचा संघर्ष होणार? याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Almonds vs Pistachios for Heart: बदाम की पिस्ता, हेल्दी हार्टसाठी कोणतं ड्रायफ्रुट बेस्ट?

Weather Update: वादळासह कोसळणार मुसळधार पाऊस; मॉन्सून परतीच्या काळात हवामान विभागाचा 14 राज्यांसाठी अलर्ट

Stress Relief Massage: रोजचा स्ट्रेस कमी करायचाय? रात्री झोपण्यापूर्वी 'ही' गोष्ट करा; सकाळी वाटेल फ्रेश

Maharashtra News Live Update: सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकाच ठिकाणी हॉस्टेल उभारणार- बावनकुळेंची घोषणा

दुष्काळ जाहीर, मात्र आदेशच नाही; महसूलमंत्र्यांची घोषणा, उपाययोजना नाहीत

SCROLL FOR NEXT