DHL Cargo Plane:
DHL Cargo Plane: Saam Tv
देश विदेश

भयानक! लँड होताच विमानाचे झाले दोन तुकडे; व्हिडिओ व्हायरल

साम वृत्तसंथा

वाशिंग्टन: मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका देशात गुरुवारी एक भयंकर विमान अपघात झाला आहे. विमानाचे (Plane) इमर्जन्सी लँडिंग करताना विमान मध्यभागी तुटून दोन तुकडे झाले आहेत. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना गुरुवारी जुआन सांतामारिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. या अपघातानंतर विमानतळ तात्पुरते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद करण्याता आले होते. (DHL Cargo Plane)

डीएचएल (DHL) च्या मालवाहू विमानात काही यांत्रिक बिघाड झाला होता, त्यामुळे त्याचे जुआन सांता मारिया विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते, यादरम्यान या विमानाचे दोन तुकडे झाले.

अपघात झालेले विमान प्रवासी विमान नसून मालवाहू विमान होते. यामुळे मोठी दुर्घटना वाचली आहे. या विमानातून मालाची वाहतुक केली जाते. कार्गो विमानात फक्त दोन क्रू मेंबर्स होते, त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. वैमानिकालाही कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही.

जर्मन कंपनी डीएचएल (DHL) चे पिवळ्या रंगाचे विमान खाली उतरले तेव्हा त्यातून धूर निघत होता. विमान धावपट्टीवरून घसरले आणि नंतर विमानाच्या मागील चाकाजवळ दोन तुकडे झाले, असल्याचे बोलले जात आहे.

गुरुवारी सकाळी १०.३० वाजता हा अपघात झाला. बोइंग-757 विमानाने सांता मारिया विमानतळावरून उड्डाण केले. पण तांत्रिक बिघाड झाल्यामुळे 25 मिनिटांनी ते विमान परत आले. त्यामुळे विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. अपघातानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. (DHL Cargo Plane)

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Ajit Pawar यांना पुतण्या Yugendra Pawar देणार आव्हान?

Today's Marathi News Live : अमोल किर्तीकर यांच्या पत्नीचाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अर्ज दाखल

Special Report : Sharad Pawar यांनी गल्ली ते दिल्ली पर्यंत फोडला घाम!

Special Report | काळ आला होता पण...हेलिकॉप्टर दुर्घटनेत अंधारे बचावल्या Jayant Patil सुद्धा सुखरूप

Special Report | Sushma Andhare यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे थोडक्यात बचावल्या

SCROLL FOR NEXT