Dhirendra Shastri Saamtv
देश विदेश

Dhirendra Shastri News: ...तर पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवू; बागेश्वर बाबाचं मोठं वक्तव्य

Dhirendra Shastri News: धीरेंद्र शास्त्री सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Bageshwar Baba News : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असणारा बागेश्वर धामचा धीरेंद्र शास्त्री पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे बागेश्वर बाबावर सडकून टीका झाली होती. आता बागेश्वर बाबाने हिंदू राष्ट्रासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. धीरेंद्र शास्त्री सध्या गुजरात दौऱ्यावर आहे, तेथील कार्यक्रमात हे वक्तव्य केलं.

गुजरातमधील कार्यक्रमातील बाबाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत बाबाने म्हटलं की, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की मी पैसे मागायला आलेलो नाही. किंवा मी येथे सन्मान घ्यायला आलो आहे. मी माझ्याकडून तुम्हाला हनुमान देण्यासाठी आलो आहे.

एवढेच नाही तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी गुजरातचे लोक एकत्र येतील, त्या दिवशी भारतच नव्हे, तर पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवू, असं वक्तव्य बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रीने केलं आहे.

धीरेंद्र शास्त्री गुजरातमधील कार्यक्रम

धीरेंद्र शास्त्री यांचे ७ जूनपर्यंत गुजरातमधील चार शहरांमध्ये कार्यक्रम होणार आहेत. सुरतनंतर अहमदाबाद, राजकोट आणि वडोदरा येथेही दिव्य न्यायालये होणार आहेत. 29 आणि 30 मे रोजी अहमदाबादमध्ये दरबार होणार आहे. 1 आणि 2 जून रोजी राजकोट आणि 3 ते 7 जून वडोदरा येथे असेल. (Latest News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ram Mandir: तुम्ही जानवे घालता, मांसाहार करता का? राम मंदिराच्या CEO पदाच्या उमेदवारांना विचारले गेले १८ प्रश्न

Maharashtra News Live Update : राज्यसभेत अमित शहांना बोलवा - मल्लिकार्जुन खर्गे

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंविरोधात संजय राऊतांच्या हॉटेलमध्ये बैठका; खासदाराच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Auto Taxi Marathi Rule : मराठी आलं नाही तर लायसन होणार रद्द! आज येणार शासनाचा मोठा निर्णय; परिवहन मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT