File photo  Saam Tv
देश विदेश

Dhanbad : झारखंड हादरलं! धनबादमध्ये मोठा बॉम्ब स्फोट; दुकानाजवळ ब्लास्ट झाल्याने ४ गंभीर जखमी

धनबाद येथील तोपचांची स्थित बाजारात बॉम्बचा मोठा स्फोट झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Dhanbad News : झारखंडच्या धनबादमधून खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. धनबाद येथील तोपचांची स्थित बाजारात बॉम्बचा मोठा स्फोट झाला आहे. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावरील पोलीस आणि नागरिकांनी गंभीर जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती दुचाकीच्या डिक्कीमध्ये बॉम्ब घेऊन बाजारात भाजी घ्यायला आला होता. यावेळीच बाजारात बॉम्ब स्फोट झाला आहे. या बॉम्ब स्फोटमध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

सर्व जखमी व्यक्तींना शहीद निर्मल महतो मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे .

बॉम्ब स्फोट कसा झाला?

धनबाद बॉम्ब स्फोटच्या घटनेवर महिला म्हणाली, ' मी तोपचांची बाजारात भाजी विकत होती. त्यावेळी एक व्यक्ती दुचाकीने आला. त्याने दुचाकीची डिक्की उघडली अन् त्याचवेळी बाजारात बॉम्ब स्पोट झाला'.

दरम्यान, पोलीस दुचाकीस्वाराची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याची सांगण्यात येत आहे. या जखमीमध्ये एका महिलेचा सामावेश असून त्यांची प्रकृती खूपच गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या दुचाकीस्वाराच्या डिक्की उघडल्यानंतर ब्लास्ट झाला, त्याची चौकशी तब्येतीत सुधारणा झाल्यावर पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT