Dog  Saam TV
देश विदेश

भयंकर घटना! कुत्रा भुंकला; भीतीनं डिलिव्हरी बॉयनं तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी

मोहम्मद रिझवान असं या स्विगी डिलिव्हरी बॉयचं नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

Hyderabad News : अन्नपदार्थाचं पार्सल घेऊन गिऱ्हाइकाच्या घरी गेलेल्या डिलिव्हरी बॉयसोबत भयंकर घटना घडली आहे. पाळीव कुत्रा अंगावर भुंकू लागल्यानं जिवाच्या भीतीनं डिलिव्हरी बॉयनं इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला आहे .

मोहम्मद रिझवान असं या स्विगी डिलिव्हरी बॉयचं नाव आहे. हैदराबाद येथील बंजारा हिल परिसरातील इमारतीत तो पार्सल घेऊन गेला होता. त्यावेळी ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉय बंजारा हिल्स येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पार्सल घेऊन गेला होता. त्याने फ्लॅटचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडल्यानंतर आत असलेला कुत्रा त्याच्यावर भुंकायला लागला. त्याच्या अंगावर धावेल अशी भीती वाटल्याने डिलिव्हरी बॉयने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.

यात तो गंभीर जखमी झाला. फ्लॅटच्या मालकाने रुग्णवाहिका बोलावून घेतली. त्याला तातडीने निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं .

२३ वर्षीय फूड डिलिव्हरी बॉय रिझवान हा श्रीरामनगर येथे राहतो. त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. रिझवानच्या भावानं या प्रकरणी बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दिली असून, कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT