Delhi viral video  Saam Tv
देश विदेश

Viral Video : दिल्लीत 5 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ

होळीच्या दिनाच्या दिवशीचा पाच मजली इमारत कोसळळ्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : होळीच्या दिनाच्या दिवशीचा पाच मजली इमारत कोसळळ्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दिल्लीतील विजय पार्क भागात ही घटना घडली आहे. पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळ्याने परिसरात एकच खळबळ उडाली. इमारत कोसळतानाचा क्षण कॅमेरात कैद झाला असून व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

दिल्लीतील (Delhi) विजय पार्क भागात ५ मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. या घटनेत इमारतीच्या आसापास असलेल्या घरांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस दल घटनास्थळी पोहोचले. यानंतर इमारतीचा मलबा हटविण्याचे काम सुरू झाले. इमारतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Viral Video News)

नेमक काय झालं?

दिल्लीच्या विजय पार्क भागात पाच मजली इमारत पत्यासारखी कोसळल्याची घटना घडली. ही घटना मौजपूर येथील गल्ली क्रमांक २४ येथे घडली. या इमारतीत राहणारे २ ते ३ कुटुंब मलब्यात अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

घटना घडल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे ४ बंब पोहोचले. त्याचबरोबर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन पथक देखील पोहोचले. ही इमारत १८ यार्ड जागेत बांधण्यात आली होती. दरम्यान, या मोठ्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या इमारतीत अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: सेवानिवृत्तीनंतर किती कालावधीत PF चे पैसे काढायचे? वाचा काय सांगतो EPFOचा नियम

Local Body Election : भाजप आमदार अत्याचार करत आहेत, शिवसेना आमदाराचे धक्कादायक विधान

Kitchen Hacks : किचनमधील लिंबू सुके पडतात? मग वापरा हि जबरदस्त ट्रिक

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Kolhapur Travel : सह्याद्री पर्वतांचे सुंदर दृश्य पाहायचंय? कोल्हापूरमधील 'या' किल्ल्यावर करा ट्रेक प्लान

SCROLL FOR NEXT