Police and forensic teams at the residence in Green Park, New Delhi, where the judge was found dead. saam tv
देश विदेश

मोठी बातमी ! तरुण न्यायाधीशांनी आयुष्य संपवलं; बाथरूममध्ये आढळला मृतदेह

Judge Found Dead In Bathroom: दिल्लीच्या सफदरजंग परिसरात न्यायाधीश अमन शर्मा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.

Bharat Jadhav

  • दिल्लीत तरुण न्यायाधीशाचा मृत्यू

  • ग्रीन पार्क परिसरातील घटना

  • बाथरूममध्ये मृतदेह आढळला

दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. येथील कडकडडूमा न्यायालयातील ३० वर्षीय न्यायाधीशांनी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेमुळे दिल्लीच्या न्यायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अमन शर्मा, असं आत्महत्या केलेल्या न्यायाधीशाचे नाव आहे. जिल्हा विधिक सेवा प्राधिकरणाचे सचिव म्हणून कार्यरत होते.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस आणि एफएसएल पथकाने आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल होत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, न्यायाधीश अमन शर्मा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे घर ग्रीन पार्क परिसरात आहे. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलीस न्यायाधीशांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत असून त्यांनी टोकाचे पाऊल का उचललेल याचा तपास करत आहेत.

घातपात आहे का?

अमन कुमार शर्मा १९ जून २०२१ रोजी दिल्ली न्यायिक सेवेत रुजू झाले होते. त्यांनी २०१८ मध्ये सिम्बायोसिस लॉ स्कूल, पुणे येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. अमन शर्मा यांनी आपल्या कार्यकाळात असंख्य फौजदारी आणि दिवाणी खटले चालवले. विविध न्यायालयांमध्ये न्यायाधीश म्हणून काम केले. ऑक्टोबर २०२५ पासून त्यांची करकरडूमा न्यायालयातील नॉर्थ-ईस्ट डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीचे पूर्णवेळ सचिव म्हणून नियुक्ती झाली होती.

आत्महत्या का केली?

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तरी कोणत्याही कटाचे किंवा घातपाताचे संकेत दिसत नाहीत, परंतु प्रत्येक पैलूचा तपास केला जातोय. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. एफएसएलचे पथकाने आत्महत्या केलेल्या घरातून संबंधित पुरावेही गोळा करत आहे. त्याच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सफदरजंग एन्क्लेव्ह पोलीस ठाण्याला शनिवारी दुपारी या घटनेची माहिती मिळाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन कुमार शर्मा यांचा मृतदेह ग्रीन पार्क येथील त्यांच्या राहत्या घराच्या बाथरूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला. प्राथमिक तपासात त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: भयंकर! पतीनं परदेशात दुसरीसोबत लग्न केलं; रागाच्या भरात पहिल्या पत्नीनं पोटच्या ४ मुलांना संपवलं

Accident: धावत्या कारवर कोसळलं भलं मोठं झाड, ४ शिक्षिकांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाची हजेरी

Nasarapur Case: नसरापूर घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा रास्तारोको, नवले पुलावर मोठी वाहतूक कोंडी; पाहा VIDEO

Honey Bee: मधमाशी चावल्याने मृत्यू होतो? नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT