Delhi Rouse Avenue Court Rejects Arvind Kejriwal Treatment Plea ANI
देश विदेश

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा आणखी एक धक्का; उपचार करण्याची याचिका फेटाळली

Arvind Kejriwal: कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना इन्सुलिन देण्याचे निर्देश तिहार तुरुंग अधिकाऱ्यांना दिले होते. त्यांच्या साखरेची पातळी आणि मधुमेहाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दररोज १५ मिनिटे डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेण्याची परवानगी मागितली होती.

Bharat Jadhav

Delhi Rouse Avenue Court Rejects Arvind Kejriwal Treatment Plea:

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने मोठा धक्का दिलाय. केजरीवाल दिल्ली दारू धोरणप्रकरणात तिहार तुरुंगात आहेत. केजरीवाल यांनी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी याचिका दाखल केली होती. केजरीवाल यांची ही याचिका न्यायालयाने फेटाळलीय.

याचिकेत केजरीवाल यांनी तिहार तुरुंग अधिकाऱ्यांकडे त्यांच्या साखरेची पातळी आणि मधुमेहाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दररोज १५ मिनिटांसाठी इन्सुलिन आणि वैद्यकीय सल्लामसलत करण्याची परवानगी मागितली होती. त्यांची याचिका कोर्टात फेटाळण्यात आली. मात्र, न्यायालयाने केजरीवाल यांच्यासाठी वैद्यकीय मंडळ तयार करण्याचे आदेश दिले आहेत. केजरीवाल १ एप्रिलपासून तिहारमध्ये असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीवर २३ एप्रिल रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.

अरविंद केजरीवाल यांना टाइप-२मधुमेह आहे. त्याला २१ मार्च रोजी दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. १८ एप्रिल रोजी केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी ट्रायल कोर्टात केजरीवाल यांच्या डॉक्टरांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वैद्यकीय सल्ला घेण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती, असा युक्तिवाद केला होता. केजरीवाल हे टाइप-२ मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी सतत चढ-उतार होत असते.

जामिनावरील जनहित याचिका फेटाळली

कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना असाधारण अंतरिम जामीन देण्याबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. सुनावणीत हायकोर्टाने ही मागणी फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना ७५ हजारांचा दंडही ठोठावला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना असाधारण अंतरिम जामीन देण्याबाबतची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना असाधारण जामीन देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

Thackeray vs Shinde: शिंदे 'नरकासूर'; नरक चतुर्दशीवरून उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका

नवी मुंबईत पालिका निवडणुकीआधी शरद पवार गटात नाराजी उफाळली; आधी बंडखोरी, आता आमलेंना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा; बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य

Tuesday Horoscope : लक्ष्मीची विशेष कृपा होणार; ५ राशींच्या लोकांची भरभराट होईल, तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT