Railway News : स्टेशनवर कसून तपासणी...पार्सल सेवा बंद! रेल्वे प्रवाशांसाठी अॅडव्हायझरी, किती दिवस अन् कारण काय? meta ai
देश विदेश

Railway News : स्टेशनवर कसून तपासणी...पार्सल सेवा बंद! रेल्वे प्रवाशांसाठी अॅडव्हायझरी, किती दिवस अन् कारण काय?

Delhi News : रेल्वे प्रवाशांसाठी उत्तर रेल्वे विभागाकडून अॅडव्हायझरी प्रसिद्ध करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावर कसून तपासणी होणार आहे. तसेच पार्सल सुविधाही बंद असेल. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Saam Tv

स्वातंत्र्यदिनाची संपूर्ण देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. कोट्यवधी देशवासियांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्याचवेळी उत्तर रेल्वे विभागानं अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून ४ दिवस म्हणजेच १६ ऑगस्टपर्यंत रेल्वे प्रवाशांसाठी अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दिल्लीतील सर्व रेल्वे स्थानकांवर कसून तपासणी होणार आहे. पार्सल सुविधाही बंद राहील.

उत्तर रेल्वे विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर रेल्वे प्रवाशांसाठी अॅडव्हायझरी प्रसिद्ध केली आहे. १३ ते १६ ऑगस्ट या कालावधीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

१५ ऑगस्ट २०२६ रोजी देशभरात ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खबरदारी म्हणून उत्तर रेल्वेने १३ ते १६ ऑगस्ट दरम्यान दिल्लीतील सर्व रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. प्रवाशांनी ट्रेनच्या वेळेआधीच स्थानकात यावे. तपासणीसाठी लागणारा वेळ लक्षात घेऊनच प्रवाशांनी नियोजन करावे, असे उत्तर रेल्वेकडून आवाहन करण्यात आले आहे.

नो पार्सल...

स्वातंत्र्यदिनी सुरक्षेच्या कारणास्तव १२ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पार्सल सेवा देखील बंद राहणार आहे. याबाबत डीआरएम कार्यालयाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. दिल्ली जंक्शन, हजरत निझामु्द्दीन, आनंद विहार टर्मिनल आणि दिल्ली सराय रोहिल्ला या प्रमुख रेल्वे स्थानकांवर सर्व प्रकारच्या पार्सलची नोंदणी; तसेच हाताळणी बंद राहणार आहे. पार्सल व्हॅन, भाड्याने घेतलेले लगेज रॅक आणि मागणीनुसार पार्सल व्हॅन यांसह सर्व प्रकारच्या पार्सल वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Fact Check: दारूच्या एका बाटलीवर दुसरी बाटली फ्री? दारूच्या फ्री बॉटलसाठी दुकानांबाहेर रांगा

जमीन हादरली, घरं थरथरली; पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

बनावट औषधांविरुद्ध एफडीएची मोठी कारवाई; चार महिन्यांत ४,२५६ ठिकाणांवर धाडी, १९ कोटींचं औषधं जप्त

विद्यार्थ्यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी

Maharashtra News Live Update: उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT