Jahangirpuri Violence Saam Tv
देश विदेश

मशिदीवर झेंडा लावण्याचा आरोप चुकीचा; किरकोळ कारणावरून वाद

जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणात दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेची माहिती दिली

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणात दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेची माहिती दिली आहे. दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना म्हणाले आहे की, पोलीस (Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमध्ये जो कोणी आरोपी (Accused) असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. या हिंसाचारात ८ पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याचे दिल्ली (Delhi) पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणाच्या तपासात १४ पथके कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले आहे की, पोलिस या घटनेच्या घटकांवर करडी नजर ठेवून आहेत. या हिंसाचार (Violence) प्रकरणात आतापर्यंत २३ जणांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले आहे की, काही वस्तुस्थितीची माहिती असल्यास तुम्ही पोलिसांशी संपर्क साधावा. कोणत्याही अफवांकडे लक्ष करू नका दुर्लक्ष करा. दिल्ली पोलीस आयुक्तांनीही अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे यावेळी सांगितले आहे.

दिल्ली पोलीस आयुक्त म्हणाले की, सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि सोशल मीडियावर चर्चा केली जात आहे. एफएसएलच्या पथकांनी आज घटनास्थळी भेट दिली. जहांगीरपुरी हिंसाचारावर दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना म्हणाले की, जो कोणी कोणत्याही वर्ग, पंथ, समुदाय आणि धर्माचा दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

Sugar-free laddoo: रक्षाबंधनासाठी साखर न वापरता बनवा हे हेल्दी लाडू; रेसिपी पाहून लगेच कराल ट्राय

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

भाजपच्या दिग्गज नेत्याची त्यांच्या घराबाहेर हत्या; राजकारणाला हादरा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT