Delhi Terrorist Arrested Saam Tv
देश विदेश

Terrorist Arrested: दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, लष्कर-ए-तोएबाच्या दहशतवाद्याला अटक

Delhi Terrorist Arrested: राजधानी दिल्लीमध्ये पोलिसांनी मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळवून लावला. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लष्कर-ए-तोएबाच्या दहशतवाद्याला अटक केली. या दहशतवाद्याच्या चौकशीतून मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

Priya More

Summary -

  • दिल्लीमध्ये मोठा दहशतवादी कट उधळवून लावला

  • लष्कर-ए-तोएबाचा दहशतवाद्याला अटक

  • आयएसआयशी संबंध असल्याचा खुलासा

  • देशभरातील नेटवर्क उघड होण्याची शक्यता

देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये मोठा दहशतवादी कट उधळवून लावण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई केली. त्यांनी लष्कर-ए-तोएबाच्या दहशतवाद्याला अटक केली. तपासातून हा दहशतवादी आयएसआयच्या संपर्कात होता आणि त्यांच्या आदेशावर काम करत होता अशी माहिती उघड झाली आहे. या दहशतवाद्याची चौकशी सुरू असून यातून देशभरामध्ये कार्यरत असलेल्या नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

दिल्ली पोलिसांनी लष्कर-ए-तोएबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोनला अटक केली. एक गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दिल्ली सीमेवर सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. देशभरामध्ये पसरलेल्या त्याच्या नेटवर्क आणि साथीदारांविषयीचे धागेदोरे मिळवण्यासाठी त्याची एका गुप्त ठिकाणी चौकशी केली जात आहे. या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात एक धक्कादायक खुलासा झाला आहे की शब्बीर अहमद लोन हा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या थेट निर्देशांनुसार काम करत होता. भारतात लष्कर-ए-तोएबाचे एक नवीन आणि घातक मॉड्यूल सक्रिय करणे हे त्याचे मुख्य काम होते. भारतामधील तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणे आणि त्यांच्याकडून सीमेपलीकडून आलेल्या आदेशांची अंमलबजावणी करणे ही कामे शब्बीरवर सोपवण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपासून तो दिल्ली आणि कोलकातासारख्या राज्यांमध्ये भारताविरोधी पोस्टर्स लावून वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दिल्लीच्या काश्मिरी गेट बस स्थानक आणि मेट्रो स्थानकांजवळ आढळलेल्या या पोस्टर्समुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तपासातून असे देखील उघड झाले आहे की, शब्बीर अहमद लोन बांगलादेशमधून हे पोस्टर मॉड्यूल चालवत होता.

सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवणे आणि राष्ट्रविरोधी भावना भडकवणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. शब्बीर बांगलादेशमधून भारतात केव्हा आणि कसा आला याचा तपास पोलिस करत आहेत. दिल्लीमध्ये काही महिन्यांपूर्वी लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्ली पोलिस सतर्क असून ते दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT