Suicide Saam Tv
देश विदेश

दिल्लीत NRI महिला डॉक्टरने कापल्या मांडीच्या नसा, सुसाइड नोटमध्ये लिहिलं...

महिला डॉक्टरने सर्जिकल ब्लेडने मांडीच्या नसा कापल्या, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. पोलीस तपासात घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीतील (Delhi) एका NRI डॉक्टरने आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून आत्महत्या केल्याघटना घडली आहे. महिला डॉक्टरने सर्जिकल ब्लेडने मांडीच्या नसा कापल्या, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. पोलीस (Police) तपासात घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये या आईच्या मृत्यूचा धक्का सहन होत नसल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे.

याबाबाद पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 40 वर्षीय मेघा कायल अविवाहित असून ती लंडनमध्ये राहत होती. ती लंडनमधील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यूरो आणि मेडिसिनची डॉक्टर होती, तर तिचे कुटुंब दिल्लीत राहत होते. मेघाची आई कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आजारी पडली, ज्यांच्यावर उपचारासाठी ती दिल्लीत आली होती.

हे देखील पहा -

27 जानेवारी रोजी मेघाच्या आईचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. आईच्या निधनाचा धक्का मेघाला सहन होत नव्हता. आईच्या निधनानंतर ती गप्प राहू लागली. याच धक्क्यातून मेघाने सर्जिकल ब्लेडने मांडीच्या नसा कापल्या. नातेवाइकांनी तिला रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मेघाचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासादरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने मेघाचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे पोलिसांना समजले.

'माझ्या आईच्या मृत्यूचा धक्का मला सहन होत नाही'

मेघा कायलने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, आईच्या मृत्यूचा धक्का मी सहन करू शकत नाहीये. मी माझ्या आईकडे जात आहे. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघाच्या वडिलांना कर्करोग आहे. घरात वडीलांशिवाय एक विधवा वहिनी आणि तिची धाकटी मुलगी आहे आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT