Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Delhi Politics : अरविंद केजरीवाल आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, दिल्लीचे नवे सीएम कोण होणार? 'ही' नावे चर्चेत

Arvind Kejriwal Latest News : दिल्लीकरांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आज म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत.

Satish Daud

दिल्लीकरांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आज म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. यासोबतच दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावांची देखील घोषण होणार आहे. त्यामुळे दिल्लीला नवे सीएम कोण मिळणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. दरम्यान, केजरीवाल यांच्या राजीनाम्यापूर्वी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.

या बैठकीतच विधीमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करून नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर सहमती होणार आहे. त्यानंतर केजरीवाल दुपारी 4.30 वाजता राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर करतील. कथित दारू घोटाळ्यात म्हणजेच अबकारी धोरण प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक झाली होती.

त्यानंतर ते तुरुंगातून जामीनावर बाहेर आले. रविवारी जामीवर सुटताच मुख्यमंत्री केजरीवाल यांनी येत्या ४८ तासांत मी राजीनामा देणार, अशी घोषणा केली होती. जोपर्यंत लोक मला 'प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र' देत नाहीत तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या या घोषणेनंतर दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप आला. दिल्लीचे पुढे मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चर्चा सुरु झाली. सुनीता केजरीवाल, आतिशी, सौरभ भारद्वाज या तिन्ही नेत्यांच्या नावांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. मात्र, अद्यापही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर उघडपणे भाष्य करण्यात आलं नाही. आज हा सस्पेन्सवरून पडदा हटणार आहे. त्यामुळे दिल्लीचे नवे सीएम नेमके कोण होणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : पराभवाच्या छायेत असणाऱ्या टीम इंडियाचा खुशखबर! इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

SCROLL FOR NEXT