Four-Storey Building Collapses : दिल्लीच्या मुस्तफाबादमध्ये ४ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १० जणांचा वाचवण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आह. घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत. स्थानिक रहिवाशांनी उपलब्ध करून दिलेल्या CCTV फुटेजमध्ये इमारत पत्त्यासारखी कोसळतानाचा क्षण कैद झालाय. फुटेजमध्ये धुळीचे लोट आणि इमारत जमीनदोस्त होताना दिसतेय. ही इमारत बांधकामाधीन असल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्लीच्या मुस्तफाबाद परिसरात शुक्रवारी रात्री ही दुर्देवी घटना घडली. दयालपूर भागात एक ४ मजली इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत १० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेय. शुक्रवारी रात्री आलेल्या धुळीच्या वादळामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत १० पेक्षा जास्त लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली दडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झालाय. दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप 8-10 जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे.
NDRF, दिल्ली पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अडकेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू आहे. डॉग स्क्वॉडच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.