Delhi MCD BJP- AAP Clash Viral Video Saam TV
देश विदेश

Delhi MCD News : दिल्ली महापालिकेत तुफान राडा; AAP नेत्याने थेट BJP नगरसेवकाच्या कानाखाली मारली, VIDEO व्हायरल

दिल्ली महापालिकेमध्ये मोठा राडा झाला आहे. या राड्यात भाजप आणि आम आदमी पार्टीच्या नगरसेवकांनी एकमेकांना लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची माहिती आहे.

Satish Daud

Delhi MCD BJP- AAP Clash Viral Video : राजधानी दिल्लीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली महापालिकेमध्ये मोठा राडा झाला आहे. या राड्यात भाजप आणि आम आदमी पार्टीच्या नगरसेवकांनी एकमेकांना लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची माहिती आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजेपासून सुरू झालेलं हे भांडणं अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. या संपूर्ण प्रकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

सुरूवातीपासून चर्चेत असलेल्या दिल्ली महापौरपदाची निवडणूक बुधवारी पार पडली. या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (AAP) शैली ओबेरॉय यांचा विजय झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या 80 दिवसांनंतर दिल्लीला नवा महापौर मिळाला आहे. शेली ओबेरॉय यांना 150 मते मिळाली. त्यांनी भाजपच्या (BJP)रेखा गुप्ता यांचा 34 मतांनी पराभव केला.

AAP नेत्याने थेट BJP नगरसेवकाच्या कानाखाली मारली

दरम्यान, निकालानंतर भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकामध्ये शाब्दीक युद्ध रंगले. आरोप-प्रत्योरोप करताना बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला, की आम आदमी पार्टीच्या एका नगरसेवकाने भाजपचे नगरसेवक प्रमोद गुप्ता यांच्या कानाखाली मारली. यावरून दोन्ही गटांच्या नगरसेवकांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

आप-भाजप नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. स्थायी समितीच्या निवडीसाठी बुधवारी सायंकाळी सात वाजल्यापासून सुरु झालेला हंगामा गुरुवारी सकाळी सात वाजले तरी काही थांबलेला नव्हता. नगरसेवक, नगरसेविकांचा रात्रभर धिंगाणा सुरु होता. या दरम्यान मोठ्या प्रमाणावर धक्काबुक्की, हाणामारी झाल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या भांडणाचे मूळ कारण हे मोबाईल असल्याचे समोर आले आहे. स्थायी समितीची निवडणूक सुरु असताना काही नगरसेवकांनी मोबाईलसोबत आणले होते.या मोबईवर भाजपच्या काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला. यावरुन भाजप-आपच्या सदस्यांमध्ये राडा झाला.

दिल्ली महापालिकेत कुणाला किती जागा?

आपचे 151 नगरसेवक असून त्यापैकी 134 निवडून आले आहेत. 13 आमदार, 3 खासदार आणि एक अपक्ष नगरसेवक पाठिंबा देत आहेत. भाजपच्या बाजूने 112 नगरसेवक असून, त्यापैकी 104 नगरसेवक निवडून आले आहेत. 7 खासदार आणि 1 आमदार आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

SCROLL FOR NEXT