BJP and AAP councillors clash during Delhi MCD pollution debate saam tv
देश विदेश

माईकची तोडफोड, फाईल्स फेकल्या; प्रदुषणाच्या चर्चेवेळी महानगरपालिकेत नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी

BJP and AAP councillors clash : दिल्ली महानगरपालिकेत प्रदूषणाबाबत चर्चा सुरू असताना भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार हाणामारी झालीय. हाणामारीनंतर महापौरांना कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सभागृहाबाहेर काढावे लागले.

Bharat Jadhav

  • प्रदूषणाच्या चर्चेदरम्यान भाजप आणि आप नगरसेवकांमध्ये हाणामारी

  • दिल्ली महापालिका सभागृहात माईक आणि फाईल्स फेकल्याने गोंधळ

  • प्रदूषणावरील बैठकीत दिल्ली महानगरपालिकेत नगरसेवकांचा राडा

राष्ट्रीय राजधानीतील वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने दिल्ली महानगरपालिकेत बैठक बोलवण्यात आली होती. मात्र या बैठकीला आखाड्याचं रुप मिळालं. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. एकमेकांच्या दिशेने माईक आणि फाईल्स हाणून फेकले. या सर्व गोंधळामुळे महापौरांना सुरक्षितपणे सभागृहाबाहेर नेण्यात आले.

सुरुवातीला आम आमदी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ सुरू केला. आपल्या संबंधित प्रभागांसाठी विकास निधी त्वरित उपलब्ध करून देण्याच्या मागणीतून वाद घातला. यावर महापौर वाही यांनी २५ लाख रुपयांचा निधी त्वरित जारी करण्याची घोषणा केली. चालू आर्थिक वर्षासाठी एकूण २ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले. मात्र, 'आप'चे नगरसेवक यावर समाधानी नव्हते. त्यांनी १ कोटी रुपयांचा निधी त्वरित देण्याची मागणी केली. नगरसेवकांनी महापौरांच्या आसनाकडे कूच केली, ज्यामुळे सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, दिल्लीतील प्रदूषणाच्या विषयावर चर्चा सुरू झाली. विरोधी पक्षाने महानगरपालिका आणि सरकारच्या प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित केले. काही वेळातच या चर्चेचे रूपांतर संघर्षात झाले. यादरम्यान 'आप'च्या नगरसेविका शगुफ्ता जुबेर आणि विरोधी पक्षनेते अंकुश नारंग यांच्यावर महापौरांच्या खुर्चीला जोडलेले माईक तोडल्याचा आरोप करण्यात आला. परिस्थिती इतकी चिघळली की, उपस्थित सदस्यांनी एकमेकांच्या दिशेने पाणी आणि सरकारी फायली फेकण्यास सुरुवात केली.

काँग्रेस नेते नाझिया दानिश आणि अंकुश नारंग यांच्यात खडाजंगी

या वादाच्यादरम्यान, काँग्रेस नेते नाझिया दानिश आणि अंकुश नारंग यांच्यात झालेली खडाजंगीनं आग तेल ओतण्याचं काम केलं. नाझिया दानिश यांनी 'आप'वर (AAP) टीका केल्यानं नारंग यांनी त्या भाजपच्या जवळ असल्याचे म्हटलं. या विधानावर नाझिया यांनी नारंग यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. सभागृहात झालेली तोडफोड आणि अयोग्य वर्तणुकीशी संबंधित प्रकरण आता शिस्तपालन समितीकडे सोपवण्यात आले आहे. महापौर प्रवेश वाही यांनी स्पष्ट केले आहे की, जर समितीने नगरसेवकांना निलंबित करण्याची शिफारस केली, तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिथून निवडून आले तिथे जनतेसाठी काम करा; पुढील 30 वर्ष...; अमित शाह यांची भविष्यवाणी, राहुल गांधींनाही दिला सल्ला|VIDEO

जरांगेंचा ५०० कोटींचा ऑडिओ बॉम्ब, ती महिला कोण? श्रीकांत शिंदे अन् भाजपच्या २ आमदारांची नावं घेतली? शिंदेसेनेच्या नेत्यांनी फडणवीसांना काय सांगितलं?

काँग्रेस आमदारचा भीषण अपघात; MLAच्या कारची इलेक्ट्रिक स्कूटरला जोरदार धडक

दुष्काळात गुन्हेगारीचा सुळसुळाट, कायदा- सुव्यवस्था बिघडली, पोलिस यंत्रणा अलर्ट

ते कोणत्या देशद्रोहीला ब्लॅकमेल करत आहेत? रुबिओंच्या मुंबई भेटीवरून राहुल गांधींचं मोठं विधान; एपस्टीन फाईल्सवरून अमेरिकेचा भारतावर दबाव?

SCROLL FOR NEXT