Delhi Politics  Saam tv
देश विदेश

Delhi Politics : लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीत महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक; केजरीवाल कोठडीत असताना होणार निवडणूक

Delhi Municipal Corporation mayor and deputy mayor election : लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीमध्ये नव्या महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल न्यायालयीन कोठडीत आम आदमी पक्षाची राजकीय परीक्षा असणार आहे.

Vishal Gangurde

Delhi Municipal Corporation News :

लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीमध्ये नव्या महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल न्यायालयीन कोठडीत आम आदमी पक्षाची राजकीय परीक्षा असणार आहे. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची युती आहे. मात्र, महापौर आणि उपमहापौरपदासाठीच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षाची युती नसणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीतील राजकारण बदललं आहे. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्ष काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागले आहे.

दिल्लीच्या महानगरपालिकेत आम आदमी पक्षाकडे बहुमत आहे. उपमहापौरपदासाठी २५० नगरसेवकांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. तसेच ७ खासदार आणि ३ राज्यसभा खासदार, १४ आमदार या निवडणुकीत मतदान करतता. तर या निवडणुकीत ९ नगरसेवकांची साथ मिळाल्यास आम आदमी पक्षाकडे मोठं संख्याबळ लाभणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस नगरसेवक किंग मेकरची भूमिका निभावणार आहे.

दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाची स्थिती काय?

आम आदमी पक्ष

१३४ नगरसेवक

१ अपक्ष नगरसेवक

३ राज्यसभा खासदार

१३ आमदार

भाजपची स्थिती काय?

१०४ नगरसेवक

१ अपक्ष

७ खासदार

१ आमदार

काँग्रेसची स्थिती काय?

काँग्रेस - ९ नगरसवेक

दरम्यान, आकडे पाहिले तर स्पष्ट होत आहे की, आम आदमी पक्षाकडे बहुमत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर पक्ष अलर्ट झाला आहे. भाजपचं त्यांच्या नगरसेवकांवर लक्ष अशणार आहे. तसेच आप आणि काँग्रेस पक्षही त्यांच्या पक्षातील नगरसेवकांवर नजर ठेवणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT