Delhi Jaipur Highway Accident 4 people killed after oil tanker hits vehicles near gurugram  Saam TV
देश विदेश

Road Accident News: भरधाव टँकरची कारला जोरदार धडक; भीषण अपघातात ४ जण होरपळले, भयानक VIDEO

Delhi Jaipur Highway Accident: भरधाव वेगात असणाऱ्या पेट्रोल वाहून नेणाऱ्या टँकरने कारला जोरदार धडक दिली. अपघातानंतर भीषण आग लागली.

Satish Daud

Delhi Jaipur Highway Accident

भरधाव वेगात असणाऱ्या पेट्रोल वाहून नेणाऱ्या टँकरने कारला जोरदार धडक दिली. अपघातानंतर भीषण आग लागली. या आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना दिल्ली-जयपूर महामार्गावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. एएनआय या वृत्तसंस्थेने अपघातासंदर्भातील माहिती दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशम दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार पूर्णपणे जळून खाक झाली. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त टँकर जयपूरहून पेट्रोल घेऊन दिल्लीच्या दिशेने येत होता.

दिल्ली-जयपूर महामार्गावरील गुरुग्राममधील सिद्रावली गावाजवळ टँकर आला असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकर थेट रस्त्यावरील दुभाजक तोडून दुसऱ्या दिशेने येणाऱ्या पिकअप कारला धडकला. कारमधील सीएनजी सिलेंडरमुळे भीषण आग लागली आणि काही क्षणात कारने पेट घेतला.

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारला लागलेली आग विझवण्यात आली. मात्र, या आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरुन फरार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

अपघाताबाबत (Accident) माहिती देताना तपास अधिकारी विनोद कुमार म्हणाले, दिल्ली-जयपूर महामार्गावर अपघात झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्ही पाहिले की एका कारला भीषण आग लागली होती. आम्हाला असेही कळाले की, पिकअप व्हॅनला एका ऑइल टँकरने धडकी दिली. त्यामुळे कारचालकासह कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

SCROLL FOR NEXT