Arvind Kejriwal  Yandex
देश विदेश

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार? ईडीच्या अटकेविरोधात आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी

Arvind Kejriwal News: दिल्लीतील कथित दारू धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे.

Satish Daud

Arvind Kejriwal Latest News

दिल्लीतील कथित दारू धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज बुधवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी होणार आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे केजरीवाल यांना जामीन मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. गेल्या गुरुवारी (ता. २१) ईडीने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना त्यांच्या दिल्लीतील निवास्थावरून अटक केली होती. यानंतर त्यांना शुक्रवारी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. केजरीवाल यांची चौकशी करण्यासाठी ईडीने १० दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती.

मात्र, न्यायालयाने ईडीची ही मागणी अमान्य करत केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत ६ दिवसांचीच न्यायालयीन कोठडी दिली. दरम्यान, ईडीने केलेल्या अटकेला आणि ट्रायल कोर्टाने दिलेल्या रिमांड आदेशाला केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांच्या वकिलाने सरन्यायाधीशांकडे तातडीने सुनावणीची मागणी केली होती. (Latest Marathi News)

मात्र, उच्च न्यायालयाने यावर तातडीची सुनावणी घेण्यास नकार देत या प्रकरणाची सुनावणी बुधवारी (२७ मार्च) होईल, असे स्पष्ट केले. त्यानुसार आज केजरीवाल यांच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहेत. त्यामुळे केजरीवाल यांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

ईडीने कोर्टात काय दावा केलाय?

दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाने मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप ईडीने केला आहे. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असल्याचा दावा ईडीने केला आहे. याप्रकरणात ईडीने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना आधीच अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT