Delhi Bike Taxi Ban Saam tv
देश विदेश

Bike Taxi Ban In Delhi: दिल्लीत बाईक टॅक्सी सेवेवर बंदी; उल्लंघन केल्यास भरावा लागेल 'इतका' दंड आणि जावं लागेल तुरुंगात

दिल्लीत खासगी बाईक टॅकेसी सेवेवर बंदी घालण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : दिल्लीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीत खासगी बाईक टॅकेसी सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या निर्णयानंतर दिल्लीतील सामान्य नागरिकांना मोठा झटका बसला आहे. दिल्ली सरकारच्या निर्णयामुळे बाईक टॅक्सीचा वापर करून कार्यालयात जाणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. दिल्ली सरकारच्या निर्णयामुळे खासगी बाईक टॅक्सीचा वापर करणाऱ्यांना इतर वाहन सेवेचा वापर करावा लागेल. (Latest Marathi News)

खासगी बाईक सेवेवर बंदी

दिल्ली (Delhi) वाहतूक विभागाने ओला, उबर, रॅपिडो सारख्या कंपन्या ज्या बाईक टॅक्सीची सेवा देतात, त्यांना सांगितले आहे की, त्यांचे चालक खासगी बाईक टॅक्सीचा वापर करतात. त्यांच्यावर तात्काळ बंदी घालावी'.

दिल्ली सरकारने म्हटले आहे की, 'दिल्लीत खासगी बाईक टॅक्सीतून भाडे तत्वावर प्रवाशांना नेणे गुन्हा ठरेल. मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दिल्ली सरकारच्या नियमाच्या उल्लंघन केल्यास खासगी बाईक टॅक्सी चालकास १ लाख रुपयांचा दंड (Fine) आणि तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो. असे स्पष्ट करण्यात आले आहे.

वाहतूक विभागाकडून नोटीस जारी

दिल्ली सरकारच्या वाहतूक विभागाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आली आहे. परिपत्रकात म्हटलं आहे की, पहिल्यांदा उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला ५००० रुपये दंड भरावा लागेल. तर दुसऱ्यांदा उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला १०,००० रुपये दंड भरावा लागेल. त्याचबरोबर १ वर्षांचा तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो. त्याचबरोबर चालक ३ महिन्यांसाठी वाहन परवाना गमावू शकतो.

...तर भरावा लागेल १ लाख रुपये दंड

काही अॅप आधारित कंपन्या १९८८ अतंर्गत उल्लंघन करत आहे. सरकारने खासगी बाईक टॅक्सी सेवेवर बंदी घातली आहे. मात्र, या संदर्भात उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास १ लाख रुपये दंड भरावा लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

SCROLL FOR NEXT