देश विदेश

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

Five-Storey Building Collapses : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळल्याने एक भीषण अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Bharat Jadhav

  • पाच मजली इमारत कोसळून भीषण दुर्घटना घडली

  • अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती

  • आतापर्यंत ४ ते ५ जणांची सुटका करण्यात आल्याची प्राथमिक माहिती

दिल्लीच्या साकेत परिसरात एक भीषण अपघात घडला. पाच मजली इमारत अचानक कोसळली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इमारत कोसळल्याची घटना घडल्यानंतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य करत आहेत.

आतापर्यंत चार ते पाच जणांना वाचवण्यात आले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले आहेत. घटनास्थळी अनेक पोलीस अधिकारी उपस्थित आहेत.

बचावकार्य सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, साकेत परिसरात अचानक झालेल्या अपघातामुळे घबराट पसरली आहे. घटनास्थळावरून लोकांना बाहेर काढण्यात आले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत अंदाजे पाच जणांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस पथक आणि वैद्यकीय पथक उपस्थित आहे. अग्निशमन दलाला सायंकाळी ७:४५ च्या सुमारास या घटनेची माहिती देण्यात आली होती.

ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन, दिल्ली पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन वैद्यकीय पथक बचावकार्यात गुंतले आहेत. बचाव पथक ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेत आहे. जवळच्या रहिवाशांना आणि दुकानांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. आतापर्यंत चार ते पाच जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

मिमिक्री अर्टिस्ट बोलायला लागले; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

BSNL Satellite Phone : iPhone पेक्षाही महाग BSNL चा सॅटेलाइट फोन! नेटवर्कशिवायही करता येणार कॉल

SCROLL FOR NEXT