Delhi Wife And Boyfriend Accused In Husband Murder Case | Crime News Saam tv
देश विदेश

Shocking : धक्कादायक! बायकोने नवऱ्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या, प्रायव्हेट पार्टवर विजेचा शॉक दिला अन्...

Delhi Crime News : दिल्लीत पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची हत्या केली. पोलिसांसमोर चोरीचा बनाव रचला, मात्र तपासात धक्कादायक सत्य समोर आले.

Alisha Khedekar

  • दक्षिण दिल्लीत पत्नीने केली पतीची हत्या

  • पत्नीने तिच्या बॉयफ्रेंडसोबत हत्येचा कट रचला

  • हत्येनंतर चोरीचा बनाव रचला

  • चौकशीनंतर पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक

  • या प्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलीस करत आहेत

दिल्लीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करत त्याची हत्या केली असल्याचं उघडकीस आलं आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची हत्या केली आणि पोलिसांसमोर बनाव रचला. याप्रकरणी आरोपी महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील रतिया मार्ग परिसरात सदर घटना घडली. मुन्ना लाल असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या बायकोचे नाव मंजू असे आहे. ९ ऑगस्ट रोजी आरोपी महिलेने आपल्या नवऱ्याला रात्रीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या. मात्र त्याने त्याच्या जीवाला कोणतीही इजा झाली नसल्याचं लक्षात येताच महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर विजेचे शॉक दिले. यावरही आरोपींचं निर्दयी मन थांबलं नाही म्हणून त्यांनी मुन्ना लालला लाकडी दांडक्याने जीव जाईपर्यंत मारहाण केली.

झोपेच्या गोळ्या, विजेचा शॉक आणि लाकडी दांडक्याच्या जबर मारहाणीत मुन्ना लाल रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. १० ऑगस्टची पहाट उजाडली आणि तिकडे मंजूने चेहऱ्यावरचा क्रूरतेचा मुखवटा उतरवून रडायला सुरुवात केली. मंजुचा आवाज ऐकून शेजारचे आहेत त्या अवस्थेत मुन्ना लालच्या घरी पोहोचले. घटनास्थळी जाताच त्यांना रक्ताच्या थारोळ्यात मुन्ना लाल निपचित पडलेला दिसला. शेजाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली.

एकीकडे मुन्नाच्या मृत्यूचे खरं कारण शोधण्यासाठी डॉक्टर शवविच्छेदन अहवाल तयार करत होते, तर दुसरीकडे पोलीस मंजूच्या घराच्या दारापाशी येऊन उभे राहिले होते. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी घराची झडती घेऊन महत्वाचे पुरावे जमा केले. त्यानंतर पुढील तपासासाठी मंजूची चौकशी करण्यात आली. या चौकशीत मंजूने टेरेसवरून काही चोर घरात घुसले. त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. या चोरीच्या प्रयत्नात मुन्ना आणि चोरांमध्ये झटपट झाली आणि त्याची हत्या झाल्याचे म्हटले. मंजूच्या या जबाबावरून पोलिसांना संशय आला. त्यांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले यामध्ये पहाटे १.४५ वाजता एक मुखवटा घातलेली व्यक्ती घरात शिरताना आणि ३.१५ वाजता बाहेर पडताना दिसली.

पोलिसांचा संशय आणखी बळावल्याने त्यांनी पोर्स्टमार्टम रिपोर्टचा अभ्यास केला. या शवविच्छेदन अहवालात पोलिसांसमोर धक्कादायक सत्य समोर आलं. मुन्ना च्या प्रायव्हेट पार्टवर झालेली इजा आणि त्याच्या अंगावर जोरदार हल्ला केल्याचे वळ यामुळे पोलिसांना संशयाचा धागा मंजू पर्यंत घेऊन गेला. यानंतर मंजुची चौकशी केल्यावर मंजू घडाघडा बोलू लागली. तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून हा कट रचल्याचं पोलिसांसमोर कबूल केलं. आरोपी मंजूच्या कबुली जबाबावरून तिच्या बॉयफ्रेंडसह इतर साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Pension : आमदारांची पेन्शन बंद होणार? नागपूर कोर्टात मोठा दावा; मोठी अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update : पुणे शहर आणि जिल्ह्यात FDA ची पुन्हा मोठी कारवाई

चैत्र, वैशाख, श्रावण... मराठी महिन्यांची नावं कशी पडली? वाचा हा जुना इतिहास

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी Good News, खात्यात पैसे येण्यास सुरूवात, तब्बल ३१९ कोटींचा निधी वर्ग

राजकारणात भूकंप! अमित शाहांना व्हायचंय उपपंतप्रधान, पण मोदींनी...; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT