Crime News Saam TV
देश विदेश

Crime News : दिल्ली पुन्हा हादरली! तरुणानं अख्खं कुटुंबच संपवलं

एकाच कुटुंबातील चौघांची चाकूने भोसकून हत्या

वृत्तसंस्था

Delhi Crime News : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ताजे असतानाच दिल्ली आणखी एका घटनेने खळबळ उडाली आहे. दिल्लीत (Delhi) एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, घरातील मुलानेच आपल्या वडिलांसह आजी आणि दोन बहिणींचा खून केला. ही घटना राज नगर पार्ट-2 भागात घडल्याचं उघडकीस आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, चौघांचीही चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. (Delhi Crime News In Marathi)

मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी या घटनेबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घातले असून मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी असलेल्या मुलाला ताब्यातही घेतलं आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे.

आरोपी मुलगा व्यसनाच्या आहारी गेलेला होता तो नुकताच व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडला असल्याचेही सांगण्यात येत आहे. पण घरी कुणाशीच त्याचं पटत नव्हतं. घरात झालेल्या वादातूनच त्याने हे धक्कादायक कृत्य केलं असावं, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एकाच कुटुबांतील चार लोकांचा खून झाल्याने संपूर्ण दिल्ली हादरली आहे.

मृत व्यक्तींची नवे

४२ वर्षीय दिनेश कुमार, आरोपीचे वडील

दिवाणो देवी, आरोपीची आजी

आरोपीची आई दर्शन सैनी (४०)

उर्वशी, आरोपीची बहीण (२२)

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सातारा जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र

Shocking : व्हॅलेंटाईन डे आधी रूम बुक; बॉयफ्रेंडला भेटायला हॉटेलमध्ये गेली, काही वेळानं अचानक तरुणीनं बाल्कनीतून मारली उडी, नेमकं काय घडलं?

Ind vs Pak : पाकिस्तानविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज, अभिषेक शर्माबाबत सूर्यकुमार यादवनं दिली महत्वाची अपडेट

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीला उपवासाला बनवा मऊसूत राजगिऱ्याचा शिरा, तोंडात टाकताच विरघळेल

Tipu Sultan Controversy: टिपू सुलतानवरून शाब्दिक युद्ध पेटलं; CM फडणवीसांनी सपकाळांना ठणकावलं

SCROLL FOR NEXT