Delhi Crime News Saam Tv
देश विदेश

Delhi Crime : नात्याला काळीमा! भाऊ अन् वडिलांनी केला अत्याचार; ११ वीच्या विद्यार्थिनीने शिक्षकांना सांगितली आपबिती

गुरुग्राममध्ये अकरावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या भावावर आणि वडिलांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

Shivani Tichkule

Delhi Crime News : दिल्लीतून बाप-लेक आणि बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. गुरुग्राममध्ये अकरावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या भावावर आणि वडिलांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

मुलीने तिच्या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना आपबिती सांगितल्यावर ही बाब उघडकीस आली. शाळेतील (School) शिक्षक आणि मुख्याध्यापकांना हे सर्व ऐकून धक्का बसला त्यांनी तातडीने तिला पोलीस ठाण्यात नेऊन वडील आणि भावाविरोधात तक्रार दाखल केली.

विद्यार्थिनीने तिच्या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सांगितले की, तिचे वडील आणि भावाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सोबतच कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडितेची सुमारे चार ते तास चौकशी केल्यानंतर खेरकी दौला पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही वस्तुस्थिती पडताळून पाहत असून आरोपींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल".

तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भाऊ आणि वडीलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT