two MLAs injured Delhi accident Saam TV marathi
देश विदेश

Accident : अचानक सीएनजीचा स्फोट अन्...; २ आमदारांच्या गाडीचा भयानक अपघात, राजकारणात खळबळ

CNG cylinder blast accident latest news : दिल्लीतील आयटीओ परिसरात सीएनजी सिलेंडरच्या स्फोटानंतर भीषण कार अपघात झाला. दोन आमदारांसह सहा जण जखमी झाले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

Namdeo Kumbhar

two MLAs injured Delhi accident : राजधानी दिल्लीमध्ये २ आमदारांच्या कारचा थरारक अन् भीषण अपघात झाला आहे. सीएनजी (CNG) सिलेंडरच्या अचानक झालेल्या भीषण स्फोटानंतर एका अनियंत्रित कारने समोरून येणाऱ्या आलिशान एसयूव्हीला (SUV) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन आमदारांसह (MLAs) ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री घडलेल्या या भयानक अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सीएनजीचा स्फोट इतका भीषण होता की वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

रविवारच्या रात्री दिल्लीतील गजबजलेल्या आयटीओ (ITO) परिसरात हा अपघात झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यालयाजवळ धावत्या कारमधील सीएनजी (CNG) सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे अनियंत्रित झालेल्या कारने थेट समोरून येणाऱ्या एसयूव्हीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन आमदारांसह एकूण ६ जण जखमी झाले आहेत.

असा घडला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ९:३० वाजताच्या आसपास ३२ वर्षीय आशुतोष पांडे हे आपल्या पत्नी आणि दोन लहान मुलांसह स्विफ्ट कारने लक्ष्मीनगरकडून आयटीओच्या दिशेने जात होते. पीडब्ल्यूडी कार्यालयाजवळ पोहोचताच त्यांच्या कारमधील सीएनजी सिलेंडरचा अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोटाच्या धक्कादायक आवाजाने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. गाडी सुरुवातीला डिव्हायडर आणि रेलिंगला धडकली, त्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ‘कर्नाटक सरकार’चा बोर्ड असलेल्या इनोव्हा एसयूव्हीवर जाऊन आदळली.

दोन आमदार जखमी

त्या इनोव्हा गाडीमध्ये किराडीचे विद्यमान आमदार अनिल झा आणि कर्नाटकचे आमदार अभय पटेल प्रवास करत होते. या धडकेत दोन्ही आमदारांसह स्विफ्ट कारमधील आशुतोष पांडे आणि त्यांचे कुटुंब, असे सर्व ६ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आयपी इस्टेट पोलीस ठाण्याचे पथक, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

सर्व जखमींची प्रकृती स्थिर

अपघातात जखमी झालेल्या सर्व ६ जणांना तातडीने एलएनजेपी (LNJP) रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने सर्वांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. धडक इतकी भीषण होती की स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला, तर इनोव्हाच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले. अपघाताच्या वेळी दोन्ही गाड्यांमधील एअरबॅग्ज उघडल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

या घटनेमुळे आयटीओ चौकातील वाहतूक काही काळ खोळंबली होती. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. सीएनजी सिलेंडरचा स्फोट नक्की कशामुळे झाला आणि अपघाताच्या वेळी गाडीचा वेग किती होता, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आज अश्रू अनावर....

Coastal Road : मुंबई कोस्टल रोडला १ वर्ष पूर्ण! २४ तास सेवेमुळे वाहनांचा वेग वाढला; आकडा वाचून चक्रावून जाल

Diamond Mangalsutra Designs: डायमंडच्या साडीवर उठून दिसतील डायमंडचे मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

Ganeshotsav : गणपती उत्सवासाठी गावी जाताना भीषण अपघात, १० जण गंभीर; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचे ₹६,००० अडकणार? 'हे' १ काम आजच करा, अन्यथा हप्ता बंद

SCROLL FOR NEXT