CBI arrests former CMD of WAPCOS
CBI arrests former CMD of WAPCOS Saam TV
देश विदेश

CBI arrests former CMD of WAPCOS : सीबीआयने WAPCOS चे माजी अध्यक्ष आणि त्यांच्या मुलाला केली अटक, ३८ कोटी रुपये केले जप्त

Satish Kengar

Money Laundering Case: केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) WAPCOS चे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) राजिंदर कुमार गुप्ता आणि त्यांचा मुलगा गौरव यांना अटक केली आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही अटक करण्यात आली.

Money Laundering Case: ३८ कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त

यासोबतच सीबीआयने १९ ठिकाणी शोधमोहीम राबवली, ज्यात ३८ कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. WAPCOS पूर्वी 'वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड' म्हणून ओळखली जात होती. हा सरकारी मालकीचा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. याचे प्रशासकीय नियंत्रण जलशक्ती मंत्रालयाकडे (Ministry of Jal Shakti) आहे.

सीबीआयने गुप्ता, त्यांची पत्नी रीमा, मुलगा गौरव आणि सून कोमल यांच्याविरुद्ध चुकीच्या मार्गाने पैसे कमावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. हा भ्रष्टाचार १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१९ या काळात ते पदावर असताना झाला होता, असं सांगण्यात येत आहे.  (Latest Marathi News)

Money Laundering Case: सीबीआयने १९ ठिकाणी टाकले छापे

याप्रकरणी मंगळवारी छापा टाकण्यात आला. एफआयआर नोंदवल्यानंतर सीबीआयच्या पथकांनी दिल्ली, गुरुग्राम, चंदीगड, सोनीपत आणि गाझियाबादमधील १९ ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली.

मंगळवारी टाकलेल्या छाप्यांमध्ये सीबीआयला २० कोटी रुपयांची रोकड सापडली, जी बुधवारी ३८ कोटींहून अधिक झाली, असे सीबीआयच्या प्रवक्त्यांनी सांगितले. रोख रक्कम, दागिने, मौल्यवान वस्तू आणि मालमत्तेची कागदपत्रे याशिवाय जप्त करण्यात आल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad Hording: घाटकोपरनंतर आता पिंपरीतही होर्डिंग कोसळलं

Latur Marriage Story | पोलिसांनी शोधलं आणि आईवडिलांसमोर लग्न लावलं! अजब-गजब प्रेमकहाणी

Borghat Waterfall : ऐन उन्हाळ्यात धबधबे झाले प्रवाहित; मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवाशांना वेगळा अनुभव, पाहा Video

श्रीकांत शिंदेंच्या घरासमोरून जात होता उद्धव ठाकरेंचा ताफा, शिवसैनिकांच्या जोरदार घोषणा, VIDEO पाहा

Today's Marathi News Live : अल्पवयीन मुलीचा खून करून मृतदेह टाकला विहिरीत , ग्रामस्थांचं मालेगाव-नामपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन

SCROLL FOR NEXT