Arvind Kejriwal On Congress ANI
देश विदेश

Arvind Kejriwal News: 'सुप्रीम कोर्टाचे आभार, दिल्लीच्या जनतेला भावुक संदेश...' CM अरविंद केजरीवाल पुन्हा तिहार जेलमध्ये जाणार!

Delhi CM Arvind Kejriwal surrender Today: लोकसभेच्या प्रचारानंतर जामिनावर बाहेर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज पुन्हा तिहार जेलमध्ये जाणार आहेत. त्याआधी त्यांनी दिवसभराचा कार्यक्रम कसा असेल? याबाबत माहिती दिली आहे.

Gangappa Pujari

दिल्ली, ता. २ जून २०२४

कथित मद्य घोटाळा प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज पुन्हा एकदा जेलमध्ये रवानगी होणार आहे. लोकसभेच्या प्रचारासाठी केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला होता. आज तीन वाजता अरविंद केजरीवाल हे तुरुंग प्रशासनासमोर सरेंडर होतील.

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मिळालेल्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा तिहार जेलमध्ये जाणार आहेत. आज दुपारी तीन वाजता ते आत्मसमर्पन करतील. त्याआधी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानत दिल्लीच्या जनतेला भावुक संदेश दिला.

"माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी 21 दिवस निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडलो. न्यायालयाचे खूप खूप आभार.आज मी तिहारला जाऊन आत्मसमर्पन करेल. मी दुपारी ३ वाजता घरून निघेन. सर्वप्रथम मी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहणार आहे. तेथून मी हनुमानजींचा आशीर्वाद घेण्यासाठी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाईन. आणि तेथून मी पक्ष कार्यालयात जाऊन सर्व कार्यकर्त्यांची आणि पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार आहे. तेथून मी पुन्हा तिहारला जाईन, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

तसेच तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. तुरुंगात तुम्हा सर्वांची मला काळजी वाटेल. तुम्ही आनंदी असाल तर तुमचे केजरीवाल तुरुंगातही सुखी राहतील, असा भावूक संदेशही त्यांनी दिल्लीच्या जनतेला दिला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांनी जामीनाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने नकार दिल्याने आज केजरीवाल यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अपरहण करून केलं भयंकर कृत्य

Maharashtra News Live Update: उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाला शरद पवार गटाचा मोठा धक्का

'गुड टच-बॅड टच' सत्रात उघडकीस आलं नराधम वॉचमनचं काळं कृत्य; नेमकं काय घडलं?

West Bengal: भाजप- टीएमसी कार्यकर्त्यांमधील वाद चिघळला, भाजप नेत्यावर बॉम्ब फेकल्याचा आरोप; १०० जण जखमी

Mangla Aditya Rajyog: 4 दिवसांनी बनणार आदित्य मंगळ राजयोग; या राशींच्या हाती लागणार पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT