Swati Maliwal News Saam Tv
देश विदेश

Swati Maliwal: ब्रेकिंग! CM केजरीवाल यांच्या पीएकडून खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण? पोलीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल

Delhi Breaking News: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पी.ए विभव कुमार यांनी मारहाण केल्याची माहिती दिल्ली पोलिसांना दिली. या गंभीर आरोपाने दिल्लीच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. १३ मे २०२४

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार तसेच दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्विय सहायकाने मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पी.ए विभव कुमार यांनी मारहाण केल्याची माहिती दिल्ली पोलिसांना दिली. या गंभीर आरोपाने दिल्लीच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सहायकाविरोधात गंभीर आरोप केल्याने दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांचे पी. ए विभव कुमार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण करण्यात आल्याचा दावा स्वाती मालीवाल यांनी केला आहे.

आज सकाळी 9 वाजता केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याची माहिती पोलिसांना फोन करून दिली. पोलिसांना फोन केलेल्या व्यक्तीने स्वाती मलिवाल असल्याचा दावा केला. या फोननंतर दिल्ली पोलिसांचे पथक चौकशीसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे.

दरम्यान, या मारहाणीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. तसेच खासदार स्वाती मालीवाल यांनी वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला आहे. याबाबतची लेखी तक्रार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT