Delhi News:  Saamtv
देश विदेश

Delhi News: कुजलेला तांदूळ, लाकडी भुसा अन् ॲसिडचा वापर.. दिल्लीत १५ टन बनावट मसाले जप्त; ३ अटकेत

Delhi News: कंपनीमध्ये लाकडाचा भूसा, कुजलेला तांदूळ, रसायनांसह भेसळ केलेले मसाले तयार केले जात होते. या कारवाईमध्ये तब्बल १५ टन मसाले जप्त करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

दिल्ली|ता. ६ मे २०२४

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने करवल नगरमध्ये बनावट मसाले बनवणाऱ्या दोन कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे. या कंपनीमध्ये लाकडाचा भूसा, कुजलेला तांदूळ, रसायनांसह भेसळ केलेले मसाले तयार केले जात होते. या कारवाईमध्ये तब्बल १५ टन मसाले जप्त करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने या संबंधीचे वृत्त दिले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट मसाले बनवणाऱ्या कारखान्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारखान्यात कुजलेला तांदूळ, लाकूड भुसा आणि रसायनांसह भेसळ केलेले मसाले तयार केले जात होते. हे दोन्ही कारखाने दिल्लीतील करावल नगर येथे आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल १५ टन मसाले जप्त केले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

या भागातील काही उत्पादक आणि दुकानदार वेगवेगळ्या ब्रँडच्या नावाने भेसळयुक्त मसाले तयार करून दिल्लीत विकत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेला या प्रकरणाचा तपास करण्यास सांगण्यात आले. या गुप्त माहितीच्या आधारेगुन्हे शाखेच्या पथकाने १ मे रोजी करवल नगर भागातील दोन कारखान्यांवर छापा टाकला.

या कारवाईमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने दिलीप उर्फ ​​बंटी आणि खुर्शीद मलिक याला घटनास्थळावरून पकडले. यावेळी दिलीप हा भेसळयुक्त हळद बनवत होता, त्यासाठी तो ॲसिड व इतर प्रतिबंधित पदार्थ वापरत होता पोलिसांना पाहून दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांना पकडण्यात आले.

या आरोपींकडे चौकशी केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाला अशाच एका कारखान्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्या कारखान्यावरही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी करवल नगर येथून 15 टन भेसळयुक्त मसाले आणि कच्चा माल जप्त केला आहे. तसेच दिलीप सिंग उर्फ ​​बंटी (46, रा. करावल नगर), सरफराज (32, रा. मुस्तफाबाद) आणि खुर्शीद मलिक (42, रा. लोणी) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाणा-नागपूर महामार्गावर बाभळीचे भलेमोठे झाड कोसळले; वाहतूक पूर्णपणे ठप्प

Raksha Bandhan 2026: २७ की २८ ऑगस्ट... यंदा राखी कधी बांधायची? भाऊ-बहिणीच्या सणाचा खरा शुभ मुहूर्त कोणता?

Skin Care: नॅचरल सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी रोज प्या 'हे' जादुई ड्रिंक; चेहऱ्यावर दिसेल नैसर्गिक चमक

Coal Mine Explosion : कोळसा खाणीत भीषण स्फोट; ३० कामगारांचा मृत्यू, १० जण अद्याप अडकले

Death News : सैराट फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन! ब्रेनहॅमरेजमुळे घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT