Delhi News  Saam Tv
देश विदेश

Delhi News: दिल्लीतील 2 रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलीस हाय अलर्ट मोडवर

Delhi Bomb Threat: अलीकडेच दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. यानंतर आज दिल्लीतील दोन रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. यावेळीही धमकी देणाऱ्या व्यक्तीने जुन्या पद्धतीने ईमेल पाठवत ही धमकी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Delhi Hospitals Receive Bomb Threat:

अलीकडेच दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. यानंतर आज दिल्लीतील दोन रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. यावेळीही धमकी देणाऱ्या व्यक्तीने जुन्या पद्धतीने ईमेल पाठवत ही धमकी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा धमकीचा मेल दिल्लीतील संजय गांधी रुग्णालय आणि बुरारी रुग्णालयला आला आहे.

रुग्णालयांनी दिली पोलिसांना माहिती

रुग्णालयांच्या तक्रारीनंतर पोलीस, अग्निशमन दल, सर्व नागरी यंत्रणांव्यतिरिक्त बॉम्ब आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. रुग्णालयात शोधमोहीम सुरू आहे. मात्र आतापर्यंत रुग्णालय परिसरातून काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही.

दरम्यान, गेल्या आठवड्यात दिल्ली आणि अहमदाबाद, गुजरातमधील शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्या नंतर अफवा ठरल्या. हे ईमेल 2 मे रोजी दिल्लीतील 131, गुरुग्राममधील पाच आणि नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील तीन शाळांना मिळाले होते.

शाळांना एकाच आयपी वरून ईमेल प्राप्त झाले होते. जे व्हीपीएन कनेक्शन वापरून पाठवण्यात आले होते. ईमेल पाठवणाऱ्या आरोपींनी सवारियम हा अरबी शब्द वापरला होता. ज्याचा अर्थ तलवारीचा संघर्ष आणि आयएसआयएसच्या प्रचाराशी संबंधित आहे. मात्र याप्रकरणी तपस करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, यात आयएसआयएसचा सहभाग असण्याची शक्यता नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT