Delhi assembly election 2025 result live updates SaamTV
देश विदेश

Delhi Assembly Election Result : दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुललं, आपचा झाडू साफ, केजरीवाल पिछाडीवर

Delhi Assembly Election 2025 Results Vote Counting Updates : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर आहेत, ज्यामुळे आप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री आतिशी मार्लेना देखील पिछाडीवर आहेत.

Namdeo Kumbhar

Delhi Assembly Election 2025 Results LIVE Updates : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या कलामध्ये भाजपने जोरदार मुसंडी घेतली आहे. ७० जागांचे सुरूवातीचे कल हाती आले आहेत, त्यामध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केल्याचे दिसत आहे. सुरूवातीच्या कलामध्ये भाजप ४२ जागांवर आघाडीवर आहे. तर आपला फक्त २८ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेस फक्त एका जागेवर आघाडीवर आहे. पोस्ट मतामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत अरविंद केजरीवाल यांना जोरदार धक्का दिलाय.

केजरीवाल-सिसोदिया पिछाडीवर -

सुरूवातीच्या कलात भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे. आपचे अनेक शिलेदार पिछाडीवर असल्याचे दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया हे सुरूवातीच्या कलामध्ये पिछाडीवर असल्याचे दिसत आहेत. तर मुख्यमंत्री आतिशी मार्लेना ही सध्या पिछाडीवर आहेत.

मुस्लिम बहुल मतदारसंघात भाजपला आघाडी -

ओखला आणि बल्लीमारान मुस्लिम बहुल मतदारसंघात मोठा उलटफेर पाहायला मिळथ आहे. या दोन जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. अवध ओझा आपल्या मतदारसंघात पिछाडीवर आहेत. त्याशिवाय सौरभ भारद्वाज यांनाही सुरूवातीच्या कलामध्ये जोरदार धक्का बसला आहे.

बादलीमधून देवेंद्र यादव (कांग्रेस) पिछाडीवर आहेत. ओखला मतदारसंघातून भाजपचे मनीष चौधरी आघाडीवर आहेत. शकूर बस्ती मतदारसंघातून सत्येंद्र जैन (आप) आघाडीवर आहेत. गांधीनगर मतदारसंघातून भाजपचे अरविंदर सिंह लवली आघाडीवर आहेत.

काँग्रेसला जोरदार धक्का -

दिल्लीमध्ये काँग्रेसने ७० जागांवर उमेदवार दिले होते, पण सुरूवातीच्या कलामध्ये फक्त एका जागेवर काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये जोरदार प्रचार केला होता, पण पोस्टल मतांमध्ये काँग्रेस फक्त एका जागेवर आघाडीवर आहे. तर आप २८ आणि भाजप ४१ जागांवर आघाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT