IAS Transfers  saam tv
देश विदेश

IAS Transfers: IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; मध्यरात्री निघालेल्या आदेशानं दिल्ली प्रशासनात मोठी खळबळ

IAS Transfers: दिल्लीत मोठा प्रशासकीय फेरबदल झाला असून, त्यात आयएएस आणि डॅनिक्स अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे.

Bharat Jadhav

  • दिल्लीमध्ये मध्यरात्री आयएएस व डॅनिक्स अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • २० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचा समावेश

  • अचानक निर्णयामुळे प्रशासनात खळबळ

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशानंतर आता दिल्लीच्या प्रशासकीय विभागात मोठा फेरबदल झाला आहे. बुधवारी मध्यरात्री दिल्लीतील आयएएस आणि डॅनिक्स अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले. २० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या अचानक झालेल्या बदल्यांमुळे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रशांत गोयल आणि नरेंद्र कुमार यांच्याही बदल्या करून त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तर या प्रशासकीय फेरबदलाकडे कामकाजाची कार्यक्षमता सुधारण्याच्या दिशेने उचललेले पाऊल म्हणून पाहिले जात आहे. बदलीच्या आदेशानुसार, डॉ. नरेंद्र कुमार यांची वित्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशांत गोयल यांची अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे डीएफसी आणि डीएससीएससीच्या सीएमडी पदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. सौम्य सौरभ यांची वायव्य जिल्ह्याचे डीएम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची उद्योग विभागात बदली झाली आहे. नवलेंद्र कुमार सिंह यांची जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त म्हणून आणि सोनिका सिंह यांची डीडीएच्या आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हर्षित जैन यांची विधानसभेत सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगल सैनी यांची केंद्रीय कारागृहाचे अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओम प्रकाश सैनी यांची डीएसएसएसबीमध्ये उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोठ्या प्रशासकीय फेरबदलात इतर अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुकेश कुमार, आशिष शौकीन, मनोज कुमार, भूप सिंग आणि अश्विनी कुमार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना नवीन पदस्थापना मिळाली. काही पदस्थापनांमध्ये बदल करण्यात आला. अमित कुमार यांचा पदस्थापना आदेश नंतर रद्द करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : वसंत मोरे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

Ready To Wear Blouse : प्रत्येक साडीसाठी नवीन ब्लाउज कशाला? 'या' ५ रंगांचे रेडी-टू-वेअर ब्लाउज खरेदी करा, शिलाईचे पैसे वाचतील

Tender coconut tips: गोड पाण्याने भरलेलं शहाळं कसं ओळखाल? पाहा सोप्या ट्रीक्स

Accident News : भयंकर अपघात! देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जणांचा आगीत होरपळून मृत्यू

Actress Hot And Bold Photos: लाल रंगाच्या बिकनीमध्ये धुमाकूळ घालणारी 34 वर्षाची अभिनेत्री कोण? Photo पाहून ओळखलं का?

SCROLL FOR NEXT