... so the missile went to Pakistan "- Defense Minister informed the Rajya Sabha ... Saam Tv
देश विदेश

Missile Incident: "...म्हणून ती मिसाईल पाकिस्तानात गेली" - संरक्षण मंत्र्यांनी राज्यसभेत दिली माहिती...

Missile Incident News: 9 मार्चला संध्याकाळी 7 वाजता, एक मिसाईल चुकून लॉन्च झाली जी पाकिस्तानमधील एका भागात पडली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: 9 मार्च २०२२ ला एक भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानात जाऊन धडकलं. यावरुन पाकिस्तानात खळबळ माजली होती. भारताने पाकिस्तानी हवाई क्षेत्राचं (Pakistan Air Space) उल्लंघन केलं असा आरोप केला. याबाबत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी या घटनेची माहिती संसदेत दिली. ती भारतीय मिसाईल (Missile) तांत्रिक चुकीमुळे लॉन्च झाली असं स्पष्टीकरण संंरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राज्यसभेत दिली. (defense minister rajnath singh apology for missile incident)

हे देखील पहा -

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत (Rajyasabha) सांगितले की, 9 मार्च 2022 ला घडलेल्या एका घटनेबद्दल मला या सभागृहाला माहिती द्यायची आहे. क्षेपणास्त्राच्या तपासणी आणि देखभालीदरम्यान अपघाताने क्षेपणास्त्र सोडण्याशी संबंधित आहे. क्षेपणास्त्र युनिटच्या नियमित देखभाल आणि तपासणी दरम्यान, संध्याकाळी 7 वाजता, एक मिसाईल चुकून लॉन्च झाली जी पाकिस्तानमधील एका भागात पडली. राजनाथ सिंह म्हणाले की, ही घटना खेदजनक आहे. पण आनंदाची बातमी अशी आहे की कोणतेही नुकसान झाले नाही अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, मी सभागृहाला कळवू इच्छितो की सरकारने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या तपासणीतून अपघाताचे नेमके कारण समोर येईल. मी हे देखील सांगू इच्छितो की या घटनेच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन, देखभाल आणि तपासणीसाठी मानक कार्यप्रणालीची पुन्हा तपासणी केली जात. पुढे ते म्हणाले की, आम्ही आमच्या शस्त्रास्त्र यंत्रणेच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देतो. काही कमतरता आढळून आल्यास ती त्वरित दुरुस्त केली जाईल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

SCROLL FOR NEXT