Dawood Ibrahim Marriage File Photo/SAAM TV
देश विदेश

Dawood Ibrahim Marriage : दाऊद इब्राहिमनं केलं दुसरं लग्न; पाकिस्तानमधील ठिकाणही बदललं

Dawood Ibrahim Changed his Address In Pakistan : दाऊद इब्राहिमनं पाकिस्तानी महिलेशी दुसरं लग्न केलं असून, कराचीमधील ठिकाणही बदललं आहे.

Saam TV News

Dawood Ibrahim Second Marriage: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमनं पाकिस्तानमध्ये दुसरं लग्न केलं आहे. त्यानं पहिली पत्नी महजबीनला तलाक दिला आहे, असा दावा दाऊदचा भाचा अली शाहनं एनआयएला दिलेल्या जबाबात केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पहिली पत्नी महजबीन ही अजूनही दाऊदसोबतच राहते.

रिपोर्ट्सनुसार, दाऊदची (Dawood Ibrahim) दुसरी पत्नी ही पाकिस्तानी असून, ती पठाण आहे. दाऊद इब्राहिमनं पाकिस्तानमधलं आपलं ठिकाणही बदललं आहे, असे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संघटना आयएसआयनं दाऊदचं ठिकाण बदललं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कराची शहरात अन्य ठिकाणी दाऊदला स्थलांतरित करण्यात आलं आहे.

दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा मुलगा अली शाहने ही माहिती एनआयएला (NIA) दिल्याचे सांगण्यात येत आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमने एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केले आहे. अली शाहने एनआयएला दिलेल्या जबाबात हा धक्कादायक खुलासा केला आहे.

दाऊदचा भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा अली शाह याने सप्टेंबर २०२२ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएच्या चौकशीत हा जबाब दिला होता. पारकरच्या मुलाच्या म्हणण्यानुसार, दाऊदचं दुसरं लग्न हे महजबीनवरून तपास यंत्रणांचं लक्ष हटवण्याचा प्रयत्न असू शकतो.

दरम्यान, तपास यंत्रणेने अनेक ठिकाणांवर छापेमारी केली होती. तर दाऊदशी संबंधित दहशतवाद्यांच्या नेटवर्कमधील शेकडो जणांना अटक करण्यात आली होती. तपास यंत्रणेकडून यासंदर्भात कोर्टात आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते.

हसीना पारकरचा मुलगा अली यानं एनआयएला सांगितलं की, दाऊद इब्राहिमच्या पहिल्या पत्नीसोबत जुलै २०२२ मध्ये दुबईमध्ये भेट झाली होती. तिथे तिने दाऊदच्या दुसऱ्या लग्नाबाबत माहिती दिली होती.

अली शाहच्या म्हणण्यानुसार, महजबीन शेख ही व्हॉट्सअॅप कॉलद्वारे दाऊदच्या भारतातील नातेवाइकांच्या संपर्कात असते. यावेळी त्याने दाऊदच्या पाकिस्तानमधील (Pakistan) नव्या ठिकाणाचीही माहिती दिली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आता कराचीत राहतो. पण त्याचे ठिकाण बदललं आहे, असा दावा त्याने केला होता, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT