Viral Video Saam TV
देश विदेश

म्हशीसमोर नाचणं तरुणीला पडलं महागात; नक्की काय घडलं? पाहा VIDEO

तरुणी म्हशीसमोर डान्स करायला सुरूवात करते.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवीन अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात, तर काही व्हिडिओ धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुणी म्हशीला चारा टाकताना दिसत आहे. चारा टाकल्यानंतर ही तरुणी म्हशीसमोर डान्स करायला सुरूवात करते. मात्र त्यावेळी म्हशीला राग येतो आणि ती या तरुणीला जोरदार धडक देते. (Bull Fighting Viral Video)

म्हशीसमोर नाचणाऱ्या या तरुणीला म्हशीनेच असा धडा शिकवला की, ही तरुणी पुन्हा उठू शकली नाही. हा गंमतीशीर व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ बारकाईने बघितला तर, यामध्ये एक तरुणी बकेटमध्ये म्हशीला चारा घेऊन येते. चारा टाकल्यानंतर संबधित तरुणी ही म्हशीसमोरच डान्स करू लागते.

दरम्यान, तरुणीचं हे कृत्य म्हशीला आवडत नाही. बेधुंद नाचत असलेल्या या तरुणीला अचानक म्हैस जोराची धडक देते. धडक बसताच तरुणी धाडकन जागेवरच पडते. म्हैस दुसरी धडक देण्याचा प्रयत्न करत असतानाच ही तरुणी जागेवरून उठते आणि तेथून पळ काढते. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT