Dalai Lama News: दलाई लामा यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते एका अल्पवयीन मुलाच्या ओठांवर चुंबन घेत आहे. त्याचबरोबर लामा हे त्या मुलाला जीभ चोखण्यास सांगत आहे. या व्हिडिओनंतर दलाई लामा यांना नेटकऱ्यांच्या टीकेचा सामोरे जावे लागले. दलाई लामा यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचया कार्यालयाने दिलगिरी व्यक्त करत स्पष्टीकरण दिले आहे. (Latest Marathi News)
वादग्रस्त व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना दलाई लामा यांच्या कार्यालयानं म्हटलं की, 'सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दलाई लामा आणि एका लहान मुलाच्या भेटीचा आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुलाने लामा यांना मिठी मारता येईल का? असे विचारले. मात्र, त्यानंतर दलाई लामा यांच्या कृतीमुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर , त्याचे कुटुंबीय आणि जगभरातील आपल्या अनेक मित्रांची दलाई लामा माफी मागू इच्छितात'.
'दलाई लामा हे सार्वजनिक ठिकाणी आणि कॅमेऱ्यासमोर देखील सर्वांशी अगदी निष्पापपणे आणि खेळकरपणे खोडी काढत असतात. पण या घटनेमुळं वाद निर्माण झाल्यानं दलाई लामा खेद व्यक्त करत आहेत,असेही दलाई लामा यांच्या कार्यलयाकडून सांगण्यात आले.
काय आहे व्हिडिओमध्ये?
दलाई लामा एका कार्यक्रमात उपस्थित होते. एक मुलगा दलाई लामा यांचं स्वागत करण्यासाठी पुढे आला असता दलाई लामा यांनी मुलाला जवळ घेतलं. त्यानंतर त्याचं चुंबन घेतलं आणि जीभ माझी जीभ चोख असं म्हटलं. या घटनेच्या व्हिडीओ (Video Viral) समोर येताच दलाई लामा यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.
दरम्यान, दलाई लामा यााधी देखील त्यांच्या वक्तव्याने वादात सापडले आहे. याआधी २०१९ मध्ये दलाई लामा यांनी , माझ्या पदाच्या जागी दलाई लामा आली तर ती अधिक आकर्षक असली पाहिजे,” असे एका मुलाखतीत सांगितले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. या वादग्रस्त वक्तव्यानंतर आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.