Crime News Saam tv
देश विदेश

Cylinder Blast : सिलेंडरचा स्फोट, अख्खं घर कोसळले; पती-पत्‍नीसह ५ जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

Namdeo Kumbhar

Bulandshahr News : उत्तर प्रदेशमधील सिकंदराबाद येथे मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे अख्खं घर कोसळले, मलब्याखाली अडकडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालाय. मलब्याखाली आणखी अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. बचाव पथकाकडून वेगाने काम सुरु आहे. आतापर्यंत पाच मृतदेह मलब्याखालून काढण्यात आलेत. मृतामध्ये पती-पत्नींचाही समावेश आहे.

सिकंदराबादमधील गुलावठी रोडवरील आशापूरी कॉलोनीतील एका घरात ऑक्सीजन सिलेंडरचा ब्लास्ट झाला. हा ब्लास्ट इतका भयंकर होता की घराचे संपूर्ण छत पत्त्याप्रमाणे कोसळले. या दुर्देवी घटनेत पती-पत्नीसह पाच जणांचा मृत्यू झालाय. बचाव पथकाचे काम वेगात सुरु आहे, त्यांनी आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. एसपी सिटी, एसडीएम सीओ आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे. जेसीबीच्या मदतीने मलबा बाजूला काढण्याचे काम करण्यात येत आहे. मलब्याखाली अजून लोक दबले केलयाची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

अख्खं कुटुंब संपवले , तीन पिढ्यांचा अंत -

सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आशापुरी कॉलोनीमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला. ऑक्सीजन सिलेंडरचा ब्लास्ट झाल्यामुळे घराचे छत कोसळले. त्याखाली दबले गेल्यामुळे पाच जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये घराचे मालक राजुद्दीन (58), पत्‍नी रुखसाना (45), मुलगा सलमान (11), सून तमन्‍ना (24) आणि हिफजा (3) यांचे मृतदेह मिळाले आहेत.

अनेकजण अडकल्याची भीती -

ऑक्सीजन सिलेंडरच्या ब्लास्टमुळे दोन मजली इमारत कोसळली. ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी घरात १५ ते २० जण होते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत ११ जणांना वाचवण्यात आलेय. त्यामधील ८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय, त्यांच्यावर उपचारसुरु आहेत. घराच्या मलब्याखाली आणखी काही जण असू शकतात, त्यामुळे शोधकार्य सुरु आहे. घराचे मालक राजुद्दीन यांची पत्नी ऱुखसाना यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना ऑक्सीजन दिले जात होते. त्याच ऑक्सीजन सिलेंडरचा ब्लॉस्ट झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी कधी जाहीर होणार? माहिती आली समोर | Marathi News

Maharashtra News Live Updates: महायुतीतील जागावाटपाचा घोळ अद्याप सुरूच

चिमणीचं वजन किती असतं, तुम्हाला माहितीये का?

Abhishek Bachchan-Aishwarya Rai: अभिषेकने ऐश्वर्याला केलेल्या प्रपोजचा किस्सा, खोटी अंगठी देत प्रेमाची कबुली

IND vs NZ 2nd Test: दुसऱ्या कसोटीचा निकाल ३ दिवसात लागणार? खेळपट्टी कोणाला देणार साथ ; पाहा पिच रिपोर्ट

SCROLL FOR NEXT