Cyclone Asani Saam Tv
देश विदेश

Cyclone Asani Alert! 'या' राज्यांमध्ये सोमवारपर्यंत अति मुसळधार पाऊस- IMD

आसनी चक्रीवादळाचा (Cyclone Asani) इशारा जारी करत, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज सांगितले की, काही राज्यांमध्ये पुढील काही दिवस अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वृत्तसंस्था

Cyclone Asani Alert: आसनी चक्रीवादळाचा (Cyclone Asani) इशारा जारी करत, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज सांगितले की, काही राज्यांमध्ये पुढील काही दिवस अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने म्हटले आहे की, दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात आणि दक्षिणेकडील अंदमान समुद्राला लागून तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी चक्री वादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज काही भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, मात्र उद्यापासून उष्णतेची लाट कमी होईल.

बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात न जाण्याचा इशारा;

मच्छिमारांना बुधवारी दक्षिण बंगालचा उपसागर आणि लगतच्या हिंदी महासागरात जाऊ नका, असा सल्ला देण्यात आला आहे. तर गुरुवार आणि शुक्रवारसाठी जारी करण्यात आलेल्या आवाहनामध्ये आग्नेय बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. शनिवार ते मंगळवार या काळात मच्छिमारांना अंदमान समुद्र आणि आसपासच्या अंदमान निकोबार बेटांमध्ये न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अतिवृष्टीचा इशारा:

19 मार्च: अंदमान आणि निकोबार बेटांवर बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान बेटांवर अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

20 मार्च: बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अंदमान बेटांवर अत्यंत मुसळधार पावसाची आणि निकोबार बेटांवर मध्यम मुसळधार पावसाची शक्यता आहे.

21 मार्च: अंदमान बेटांवर बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. निकोबार बेटांवर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उष्णतेचा इशारा:

IMD कडून सांगण्यात आले आहे की आज, 19 मार्च रोजी पश्चिम राजस्थानच्या भागात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट आणि 20 मार्च रोजी उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे; पुढील 4 दिवसांत पश्चिम मध्य प्रदेश आणि आज, 19 मार्च रोजी गुजरात राज्यात उष्णता जाणवेल.

उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी गारपिटीची शक्यता;

असानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवस देशात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता सांगितली आहे. केरळसह तामिळनाडू, पुद्ददुचेरी कराईकल आणि दक्षिण कर्नाटकात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरला, भाजपच्या मंत्र्याची राजधानीत घोषणा

Maharashtra Live News Update: अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाचे शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतले शैक्षणिक पालकत्वं

Maharashtra Politics: विलिनीकरणावरून वाद पेटला; अजित पवार गटाच्या आमदाराचा शरद पवार गटावर हल्लाबोल

मोठी बातमी! भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नाही, कारण आलं समोर

राज्यात मोठी घडामोड! भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे; पत्रावर घेतली स्वाक्षरी? नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT