'Lance Naik' and 'Naik' ranks reintroduced in CRPF after 30 years saam tv
देश विदेश

CRPF मध्ये होणार मोठा बदल; ३० वर्षांनंतर 'लान्स नायक' आणि 'नायक' पदे पुन्हा होणार सुरू, किती असते सॅलरी?

केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) तब्बल ३० वर्षांनंतर 'लान्स नायक' आणि 'नायक' ही लष्करी दर्जाची पदे पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालय गांभीर्याने विचार करत आहे.

Saam Tv

केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) सुमारे ३० वर्षांपूर्वी रद्द करण्यात आलेली 'लान्स नायक' आणि 'नायक' ही लष्करी दर्जाची पदे पुन्हा सुरू करण्याबाबत सरकार विचाराधीन आहे. केंद्रीय गृह मंत्रालय या ऐतिहासिक प्रस्तावावर वेगाने काम करत असून, या निर्णयामुळे जवानांच्या पदोन्नतीमधील (प्रमोशन) अडथळे दूर होण्यासोबतच भविष्यात सेवानिवृत्त होणाऱ्या अग्निवीरांनाही याचा मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफने या पदांच्या पुनरुजीवनासाठी हालचाली सुरू केल्या असून, दलातील 'फील्ड युनिट्स' आणि जवानांकडून यावर मते मागवण्यात आली आहेत. सुमारे तीन दशकांपूर्वी ही पदे अनुक्रमे 'कॉन्स्टेबल' आणि 'हेड कॉन्स्टेबल' या पदांमध्ये विलीन करण्यात आली होती.

हा निर्णय का घेतला जात आहे?

सध्या कॉन्स्टेबल पदावरील जवानांना पुढील पदोन्नतीसाठी मोठी वाट पाहावी लागते. 'लान्स नायक' आणि 'नायक' ही पदे पुन्हा अस्तित्वात आल्यास पदोन्नतीची प्रक्रिया सुलभ आणि जलद होईल.

अग्निवीरांना कसा फायदा होणार?

चार वर्षांची सेवा पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या अग्निवीरांना सीआरपीएफमध्ये सामावून घेताना आणि त्यांना सेवाज्येष्ठतेनुसार योग्य पद उपलब्ध करून देताना या रचनेचा मोठा फायदा होईल.

या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधित अधिकारी व जवानांचे अभिप्राय जाणून घेतले जात आहेत, जेणेकरून दलातील शिस्त आणि कार्यक्षमता अधिक मजबूत करता येईल.

CRPF मधील 'लांस नायक' आणि 'नायक' पदाची वेतन श्रेणी

या पदांचा पगार ७ व्या वेतन आयोगानुसार ठरवला जातो. मूळ पगारासोबतच जवानांना विविध भत्ते देखील मिळतात. कॉन्स्टेबल पदाचा पगार लेव्हल ३ नुसार सुमारे २१,७०० रुपयांपासून सुरू होतो, तर 'नायक' पदासाठी लेव्हल ४ नुसार मूळ पगार २५,५०० रुपयांपासून सुरू होतो. एकूण पगारात महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, राशन मनी भत्ता आणि जोखीम किंवा कठीण सेवा भत्त्याचा समावेश असतो. त्यामुळे तैनातीचे ठिकाण नक्षलग्रस्त भाग किंवा जम्मू-काश्मीर यांसारख्या संवेदनशील क्षेत्रात असल्यास जवानांचा प्रत्यक्ष मासिक पगार सुमारे ३८,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत किंवा त्याहून अधिक असू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT