Crime News Saam tv
देश विदेश

Crime News: भयानक! दारू प्यायला, बंद खोलीत बलात्कार केला; बेशुद्ध अवस्थेत आढळली चिमुकली

Crime News: एका ५ वर्षीय निष्पाप मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. नराधम १६ वर्षीय मुलाने हे भयानक कृत्य केलं आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे. एका ५ वर्षीय निष्पाप मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. नराधम १६ वर्षीय मुलाने हे भयानक कृत्य केलं आहे. आरोपी लग्नाला गेला होता. जिथे त्याने दारू प्यायली होती. लग्नाच्या मिरवणुकीवरून परतल्यानंतर आरोपीने हा गुन्हा केला. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील दिनारा पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील दिनारा पोलीस स्टेशन परिसरात एका चिमुकलीवर लैगिंक अत्याचाराचा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक त्याठिकाणी पोहचले. पोलिसांनी पीडित चिमुकलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं घडलं काय?

दिनारा पोलीस स्टेशन परिसरात लग्न सोहळा होता. लग्न सोहळ्यात एका १६ वर्षीय मुलाने दारू प्यायली होती. दारू प्यायल्यानंतर त्याने चिमुकलीसोबत भयानक कृत्य केलंय. आरोपी शेजारी राहणाऱ्या ५ वर्षीय मुलीला खोलीत घेऊन गेला.

यानंतर आरोपीने निष्पाप मुलीवर बलात्कार केला. सुमारे दीड तासानंतर, कुटुंबातील सदस्यांनी मुलीचा शोध घेतला, तेव्हा ती तिच्या घराजवळील एका रिकाम्या घरात बेशुद्ध आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिची ही स्थिती पाहून अनेकांना धक्काच बसला. तातडीने पोलिसांना या बद्दलची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत चिमुकलीला रुग्णालयात नेलं. तसेच आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णणावर नागरिक संतप्त, शिंदेसेनेचा आंदोलनाचा इशारा

Methi Ladoo Recipe: कडवटपणा निघून जाईल! मेथीच्या लाडूची ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील लहान मुलेही मागून खातील

Private railway station: ना टॅक्सी...ना कार..नवाबासाठी ट्रेन थेट राजवाड्यात यायची! या रेल्वे स्टेशनबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Pune : पुण्यातील कृषी महाविद्यलयातील डॉ. महानंद माने यांची बदली, कुठे झाली नियुक्ती?

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

SCROLL FOR NEXT