Latest Crime News Saam Tv News
देश विदेश

Crime news: प्रायव्हेट पार्टला इजा अन् गळ्याला...; ५ वर्षीय चिमुकलीवर नराधमाकडून अत्याचार

Latest Crime News: गयाजीमध्ये एका ५ वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. मुलीवर बलात्कार करण्यात आला. नंतर टॉवेलनं गळा दाबून तिची हत्या करण्यात आली.

Bhagyashree Kamble

बिहारमधील गयाजीमध्ये एका ५ वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. गयाजीच्या डोभी भागात मुलीवर बलात्कार करण्यात आला. नंतर टॉवेलनं गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. पिपरघट्टी येथील वन विभागाच्या नर्सरीच्या शौचालयात मुलीचा मृतदेह आढळला. मुलीच्या गुप्तांगातून रक्त वाहत होते. पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. ५ वर्षांची मुलगी तिच्या मोठ्या बहिणीसोबत डोभीच्या पिपरघट्टी बाजारात औषध घेण्यासाठी गेली होती. औषध घेतल्यानंतर तिची मोठी बहीण घरी परतली. पण लहान मुलगी काही घरी परतली नाही. त्यानंतर मोठ्या बहिणीनं याबाबत तिच्या वडिलांना याची माहिती दिली.

७ वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील सदस्यांनी शोध घेण्यास सुरूवात केली. रात्री उशिरा सर्व कुटुंब मुलीचा शोध घेत हा नर्सरीच्या खोलीत गेले. ह्रदयद्रावक दृश्य पाहून अनेकांना धक्काच बसला. याठिकाणी मुलीच्या गळ्यात टॉवेल बांधलेला होता. घटनास्थळी रक्ताचे डाग होते. मुलीचे कपडे विस्कटलेले होते. तिच्या गुप्तांगातून रक्त वाहत होते. मुलगी मृतावस्थेत पडलेली होती.

कुटुंबाने मुलीला घरात आणले. तसेच पोलिसांना याची माहिती दिली. त्यांनी शेजारी राहणाऱ्या मुलावर संशय व्यक्त केला. १५ दिवसांपूर्वी पैसे चोरीला गेल्याचंही त्यांनी सांगितलं. मृताच्या कुटुंबियांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT