Viral Video x
देश विदेश

इतक्या गोळ्या घालेन की घरचे तुला ओळखू शकणार नाही, पेट्रोल पंपावर तरुणीची भाईगिरी! कर्मचाऱ्याच्या छातीवर रिव्हॉल्व्हर रोखली अन्...

Viral Video : एका तरुणीने हातात रिव्हॉल्व्हर घेत पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला धमकावले. तिने रागाच्या भरात रिव्हॉल्व्हर कर्मचाऱ्याच्या छातीवर रोखले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या छातीवर एका तरुणीने रिव्हॉल्व्हर रोखल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरुन आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीला आणि तिच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. तसेच रिव्हॉल्व्हर देखील जप्त केले आहे. ही घटना उत्तरप्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात घडली आहे.

गाडीत सीएनजी भरत असताना कर्मचाऱ्याने गाडीत बसलेल्या लोकांना खाली उतरण्यास सांगितले. त्यावेळेस हा वाद झाला. भांडण सुरु झाल्यानंतर मुलीने सेल्समनच्या छातीवर रिव्हॉल्व्हर रोखत धमकी दिली. या घटनेमुळे घटनास्थळी खळबळ उडाली आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि कर्मचाऱ्याने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई केली.

व्हायरल व्हिडीओमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचारी तरुणीच्या वडिलांसोबत बोलत असल्याचे दिसते. एकजण भांडण सोडवत असल्याचेही पाहायला मिळते. तरुणीचे वडील तावातावात कर्मचाऱ्यांवर ओरडत होते. तेवढ्यात मागून तरुणी धावत येते आणि हातातील रिव्हॉल्व्हर कर्मचाऱ्याच्या छातीवर रोखते. 'इतक्या गोळ्या घालेन, तुझ्या घरचे तुला ओळखू शकणार नाही', असे म्हणत तरुणी कर्मचाऱ्याला धमकावते. त्यानंतर काहीजण मध्यस्थी करताना व्हिडीओत दिसते.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पोलिसांनी तरुणी आणि तिच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तरुणी आणि तिच्या वडिलांना ताब्यात घेतले. तरुणीकडून रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली आहे. काही तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तरुणीला आणि तिच्या वडिलांना सोडून दिल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT