Mohammed Shami Mother Saam Tv
देश विदेश

Mohammed Shami Mother: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान क्रिकेटपटू शमीच्या आईची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

Cricket World Cup Final Match 2023: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान क्रिकेटपटू शमीच्या आईची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

Satish Kengar

Cricket World Cup Final Match 2023 :

गुजरातमधील अहमदाबाद येथे क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामना सुरु आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात हा सामना खेळला जात आहे. याच दरम्यान एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीची आई अंजुम यांची प्रकृती अचानक बिघडली असल्याची माहिती मिळत आहे.

शमीच्या आईची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले होते. यानंतरही त्याच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने कुटुंबीयांनी शमीच्या आईला मुरादाबाद येथील सुपरटेक मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी शमीच्या आईची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शमीचा भाऊ डॉ. मुमताज यांनी सांगितले की, ताप आणि अस्वस्थतेमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितलं की, त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

एक दिवस आधी शमीच्या आईने भारताच्या विजयासाठी केली होती प्रार्थना

क्रिकेटपटू मोहम्मद शमीची आई अंजुम आरानेही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

गेल्या पाच दिवसांपासून त्या त्यांच्या गावी सहसपूर अलीनगर येथे वडिलोपार्जित घरात राहत आहेत. त्यांच्या घरी अनेक गावकरी मुलाच्या कामगिरीमुळे त्यांना अभिनंदन करण्यासाठी भेट देत आहेत. शनिवारी त्यांनी भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थनाही केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Refrigerator Placement: किचनमध्ये फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

Gold Price Today : खुशखबर! दिवाळीपूर्वी सोने-चांदी झालं स्वस्त! ग्राहकांसाठी मोठा दिलासा, जाणून घ्या आजचा भाव

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Marathi Actress Prajakta : 'Gen Z च्या नावाखाली हि**, समलिंगी...'; अभिनेत्री प्राजक्तावर आक्षेपार्ह कमेंट, नेटकरी संतापले

Diwali Faral : ना तूप, ना तेल! तरीही चवीला स्वादिष्ट; दिवाळी फराळ बनवण्याची खास ट्रिक लगेच वाचा

SCROLL FOR NEXT