Iraq Covid-19 Hospital Fire Twitter/
देश विदेश

इराक मधिल कोविड रुग्णालयाला भिषण आग; 44 रुग्ण जळून खाक

ऑक्सिजन (Iraq Covid-19 Hospital Fire) टाकीच्या स्फोटात लागलेल्या आगीत कमीतकमी 44 लोक ठार झाले असून 67 हून अधिक जखमी झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी सोमवारी दिली आहे.

वृत्तसंस्था

इराकच्या दक्षिणेकडील शहर नासिरीया (Nasriyah) येथील कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन (Iraq Covid-19 Hospital Fire) टाकीच्या स्फोटात लागलेल्या आगीत कमीतकमी 44 लोक ठार झाले असून 67 हून अधिक जखमी झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी सोमवारी दिली आहे. बचावकर्त्यांनी अधिकाधिक मृतदेह बाहेर काढले आहेत. पंतप्रधान मुस्तफा अल-कधिमी यांनी वरिष्ठ मंत्र्यांसमवेत तातडीने बैठक घेतली आणि नासिरियातील आरोग्य व नागरी संरक्षण व्यवस्थापकांना निलंबित आणि अटक करण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांच्या कार्यालयाने निवेदनात म्हटले आहे.

रुग्णालयाच्या व्यवस्थापकालाही निलंबित करण्यात आले असून त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. युद्ध आणि निर्बंधांमुळे आधीच डळमळीत झालेल्या इराकच्या आरोग्य सेवा यंत्रणेने कोरोनाव्हायरसच्या संकटाला तोंड देण्यासाठी संघर्ष केला आहे. इराकमध्ये आतापर्यंत 17,592 लोक कोरोनामुळे ठार झाले असून 1.4 दशलक्षाहून अधिक संक्रमित झाले आहेत.

"बर्‍याच रूग्णांना वाढत्या धुरामुळे खोकला येत असताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी जळालेल्या रुग्णालयाबाहेर मृतदेह काढले," असे आगीच्या ठिकाणी असलेल्या माध्यामांनी सांगितले. नसीरिया येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आग नियंत्रणात आणल्यानंतर अल-हुसेन रुग्णालयात शोध मोहीम सुरु होते. परंतू धुराच्या प्रचंड धूरांमुळे आणि काही प्रभागात आगिच्या भडक्यामुळे प्रवेश करणे त्रासदायक बनले होते. "तीव्र आगीमुळे कोरोना वॉर्डात अनेक रुग्ण अडकले होते आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बचाव दल संघर्ष करीत होते," एका आरोग्य कर्मचाऱ्याने ज्वलंत इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी माध्यमाला सांगितले.

रुग्णालयाच्या कोविड-19 प्रभागात ऑक्सिजन टाकीचा स्फोट झाला आणि आग पसरली, असे आगीच्या ठिकाणी असलेल्या एका पोलिसांनी सांगितले. जखमी रूग्णांना आगीपासून दूर नेण्यास मदत करणारे रुग्णालयाचे गार्ड अली मुहसीन म्हणाले, “कोरोनाच्या वॉर्डात मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आग फार लवकर भडकली”.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT